शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मसाजसाठी येऊन शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:09 IST

मार्केटयार्ड पोलिसांनी सुरेश किसन माने (वय ३२, रा. धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही घटना मार्केटयार्डातील एका आयुर्वेदिक ...

मार्केटयार्ड पोलिसांनी सुरेश किसन माने (वय ३२, रा. धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही घटना मार्केटयार्डातील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात १३ ते १५ जानेवारीदरम्यान घडली. या प्रकरणी मसाज करणाऱ्या एका महिलेने फिर्याद दिली आहे.

ही महिला एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज करण्याचे काम करते. सुरेश माने हा ग्राहक म्हणून या केंद्रात आला होता. त्याने तेथे मसाज करून घेतला. मसाज करताना त्याने फिर्यादीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. हा व्हिडीओ व्हायरल करतो, नाहीतर माझ्यासोबत शरीरसंबंध कर, अशी धमकी या तरुणाने महिलेला दिली. त्याने मसाज करतानाचा व्हिडीओ तिच्या मोबाइलवर पाठवून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

शहरातील अनेक ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत दिसून आले आहे. असे असले, तरी अनेक ठिकाणी केवळ मसाजच केला जातो. तरीही तेथे काम करणाऱ्या महिलांकडे वाकड्या नजरेने पाहिले जाते. त्यांच्याकडूनही तशाच अपेक्षा ठेवल्या जातात.

या घटनेची माहिती मिळाल्यावर, मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांनी धमकावणाऱ्या सुरेश माने याला अटक केली असून, पोलीस निरीक्षक ढमढेरे अधिक तपास करीत आहेत.