पुणे : स्वारगेट डेपोच्या लेजर विभागातून पुणे महानगर परिवहन महामंडळाची तिकिटे घेऊनही प्रवाशांना बनावट तिकिटे देणाऱ्या वाहकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वाहनचालकाने ७,५३० रुपये किमतीची बनावट तिकिटांची विक्री केली आहे. महामंडळाच्या कंमाडो पथकाच्या पर्यवेक्षकांच्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराची महामंडळाने तत्काळ शहानिशा करून वाहकाला निलंबितही करण्यात आले. न्यायालयाने त्याला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. संतोष लक्ष्मण गुजर (वय ४२, रा. शिवाजीनगर गावठाण) असे या वाहकाचे नाव आहे. या प्रकरणी पर्यवेक्षक इस्माईल गनीमियाँ अत्तार (वय ४८, रा. पीएमटी कॉलनी, घोरपडी पेठ) असे फिर्यादीचे नाव आहे.गुजर याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. बनावट तिकिटे त्याने कोठे बनवली, अशा प्रकारे त्याने काही गुन्हे केले आहेत का, इतर कोण साथीदार आहेत, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. (प्रतिनिधी)४शुक्रवारी (९ जानेवारी) सांयकाळी ७ वाजता सुमारास हा प्रकार उघडकीस आला. स्वारगेट ते नीलज्योती या बसमार्गावर गुजर काम करीत होता, त्या वेळी महामंडळातील कंमाडो पथकाचे पर्यवेक्षक अत्तार व मडके यांनी बसमध्ये तपासणी करण्यास सुरुवात केली. त्या वेळी त्यांना वेगवेगळ्या नंबरची तिकिटे आढळून आली. ४याबाबत त्याच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी झडती घेतली. त्याच्याकडील तिकीट ट्रे वरील व खिशातील तिकिटांचा साठा तपासण्यात आला, तेव्हा त्या तिकिटांमध्ये छपाईमध्ये फरक आढळून आले. ४तसेच, गुजर याने त्याच्या वैयक्तिक लॉकरमध्ये जुने वेबील्स व काही कोरे वेबील्स बेकायदेशीररीत्या ठेवल्याचे आढळले. गुजरकडे १० रुपयांची ३०६ तिकिटे, तर १५ रुपयांची २९७ तिकिटे, अशी एकूण ६०३ तिकिटे पीएमपीची नसल्याचे आढळले. ४डेपोच्या लेजर विभागातून १५ व २० रुपयांच्या तिकिटांचे ब्लॉक घेतले व प्रवासादरम्यान लोकांकडून तिकिटाचे पैसे घेऊन त्यांना बनावट तिकिटांची विक्री केली.
बनावट तिकीटविक्री करणाऱ्या पीएमपीच्या वाहकाला अटक
By admin | Updated: January 11, 2015 00:52 IST