राजेवाडी : पारगाव मेमाणे येथे कुंकवाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या हडपसर येथील वृद्ध दाम्पत्यास वाघापूर-चौफुल्याजवळील तुकाई टेकडीमागील सिंगापूर वनविभागाच्या हद्दीत चाकूचा धाक दाखवून पंधरा तोळे भरदिवसा दोन अज्ञात चोरट्यांनी लुटल्याने खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : पारगाव येथील गायरान वस्तीवर शंकरराव मेमाणे यांच्या मुलीच्या कुंकवाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी सातववाडी हडपसर येथून दत्तात्रय पवार (वय ६२) व त्यांची पत्नी सुमन दत्तात्रय पवार गायरान वस्ती (पारगाव मेमाणे) येथील कार्यक्रम आटोपून टक्के वस्ती येथील पाहुण्यांना भेटून तुकाई मंदिराच्या पाठीमागून वाघापूर-चौफुल्याकडे वन विभागाच्या हद्दीतून जात होते. त्या वेळी नवी कोरी बिगर नंबरची दुचाकी घेऊन दोन तरुणांनी पवार दाम्पत्याला थांबविले व मावशी आम्हाला माळशिरसला जायचे आहे, रस्ता बरोबर आहे का? असे विचारून गाडीवरून खाली उतरले. त्या वेळी सुमन पवारांनी हा रस्ता चुकीचा असल्याचे सांगितले. तेवढ्यात गाडी चालवणाऱ्या अज्ञात चोरट्याने चाकू बाहेर काढला. सुमन पवारांनी गळ्यातील ४ तोळ््याचे गंठण, साडेचार तोळ््याची मोहनमाळ, १ तोळ््याचे पदराचे मणी, अर्धा तोळ््याची सोन्याची अंगठी तसेच अर्धा तोळ््याची अंगठी काढून दिली. तसेच त्यांनी दत्तात्रय पवार यांच्या बोटातील १ तोळ्याची अंगठीही काढून घेतली व हिरोहोंडा गाडीच्या पुढच्या टायरवर चाकूचा वार करून टायर पंक्चर केला व दागिने घेऊन वाघापूर-चौफुल्याच्या दिशेने फरार झाले. (वार्ताहर)
वाघापूर-चौफुल्याजवळ भरदिवसा १५ तोळे लुटले
By admin | Updated: August 17, 2015 02:53 IST