शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शिल्पकारांना आध्यात्मिक बैैठक असावी - विवेक खटावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:16 IST

पर्यावरणपूरकतेचे संस्कार मुलांवर शालेय स्तरापासून होणे गरजेचे आहे. कलाकारांनी उत्सवाला विधायक दिशा देण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यातून समृद्धीकडे वाटचाल होऊ शकेल, असे मत ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

गणेशोत्सव हा समृद्ध कलेचा उत्सव असतो. शिल्प, मूर्ती घडवत असताना कलाकाराने मूर्तिशास्त्र अभ्यास, सूक्ष्म निरीक्षण, रेखाटन, कलाकुसर आदी बाबींचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे असते. शिल्पकाराला वैैचारिक बैैठकीबरोबरच आध्यात्मिक बैैठकही असायला हवी. शिल्पकारांनी पर्यावरणपूरक विचार करणे गरजेचे असते. पर्यावरणपूरकतेचे संस्कार मुलांवर शालेय स्तरापासून होणे गरजेचे आहे. कलाकारांनी उत्सवाला विधायक दिशा देण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यातून समृद्धीकडे वाटचाल होऊ शकेल, असे मत ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.गणेशोत्सव हा समृद्ध कलेचा उत्सव असतो. गणरायाला ६४ कलांचा अधिपती म्हणून संबोधले जाते. या उत्सवामध्ये प्रत्येक कला समृद्ध होत असते. कलेची समृद्धी दर्शवणारा हा संपन्न उत्सव आहे. या माध्यमातून शिल्पकार, मूर्तिकारांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध होते. गणेशोत्सव कलाकारांना उदंड अनुभव मिळवून देतो. उत्सवात कोणतेही काम नेटाने करण्याची सवय लागली की कलाकाराची घोडदौैड कोणीही रोखू शकत नाही. शिल्पकारांना कामात शिस्त लागणे, वेळेवर काम पूर्ण करणे, वेळेची मर्यादा पाळणे, कामाचे परिपूर्ण नियोजन आदी गुण अंगी बाणवले जातात.काळाच्या ओघात शिल्पकला, मूर्तिकलेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. मात्र, सजावटीच्या क्षेत्रात येणाºया पदवीधारक कलाकारांची संख्या कमी होत आहे. पूर्वीपासून सजावट क्षेत्रात काम करणाºया कलाकारांना समाजात कमी लेखले जाते. त्यामुळे पदवीधारकांपेक्षा काम करत करत शिकणाºया कलाकारांची संख्या जास्त आहे. शिल्पकारांनी या क्षेत्रात कार्यरत असताना मूर्तिशास्त्राचा अभ्यास, बारकाईने निरीक्षण, शिल्पकला आणि मूर्तिकला यातील फरक सूक्ष्मपणे जाणून घेणे आवश्यक असते.मला वडिलांकडून (डी. एस. खटावकर) शिल्पकलेचे बाळकडू मिळाले. जे.जे. स्कूल आॅफ आर्टमधून जी. डी. आर्टचे शिक्षण घेतल्यानंतर गणेशोत्सवात काम करण्याची संधी मिळाली. या उत्सवाने मला घडवले आणि समृद्ध केले, कामातील शिस्त शिकवली. सर्व प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांशी संवाद साधता आला, त्यांच्याकडून कामातील चुका उमगल्या आणि स्वत:मध्ये सुधारणा करता आली. कलाकार स्वमग्नतेने काम करत असतो. त्यामुळे तो समाजापासून, सामान्यांपासून दूर असतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कलाकारांना अनेकांशी संवाद साधता येतो. सामोपचाराच्या भूमिकेतून काम करत असताना निश्चितपणे यश मिळते. नागेश शिंपी हे मूर्तिशास्त्राचे मोठे अभ्यासक होते. त्यांच्याप्रमाणे गणेशोत्सव का साजरा केला जातो, त्यामागची भूमिका काय, मूर्तिशास्त्राचे महत्त्व याबाबतचा सखोल अभ्यास आजवर करण्यात आलेला नाही.शिल्प किंवा मूर्ती घडवत असताना बैठक कशी असावी, याला या प्रक्रियेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. मूर्तिशास्त्राची अनेक पुस्तके यासंदर्भात उपलब्ध आहेत. गणपतीची मूर्ती घडवताना पंचमहाभूतांची प्रतीके त्या मूर्तीमध्ये समाविष्ट असणे अत्यंत आवश्यक असते. या प्रतीकांची योग्य मांडणी, प्रमाण, अभ्यासपूर्ण मूर्ती असे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मूर्तीचे वर्णन करता येईल. हेमाडपंती, पेशवाई अशी विविधांगी बैैठक असलेल्या सर्वांगसुंदर मूर्ती मन प्रसन्न करतात. यंदा दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासाठी ब्रह्मणस्पती मंदिराची सजावट करण्यात येत आहे. नागर, द्राविड अशा विविध मंदिरशैैली अस्तित्वात असताना वेगळ्या पद्धतीची रचना करण्याच्या दृष्टीने हा विषय निवडण्यात आला आहे. गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौैप्यमहोत्सव साजरा करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे, ही भाग्याची गोष्ट आहे.गणेशोत्सवाचे स्वरूप काळानुरूप बदलत आहे. शिल्पकलेमध्येही नवीन तंत्रज्ञान येत आहे. फायबर ग्लासप्रमाणेच सध्या वजनाने हलक्या असणाºया पॉलीयुरेथिन फोमचा वापरही करता येऊ शकतो. शिल्पकारांनी पर्यावरणपूरक विचार करणे गरजेचे असते. पर्यावरणपूरकतेचे संस्कार मुलांवर शालेय स्तरापासून होणे गरजेचे आहे. कलाकारांनी उत्सवाला विधायक दिशा देण्याचा प्रयत्न सातत्याने करायला हवा. त्यातून समृद्धीकडे वाटचाल होऊ शकेल.