शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दौंड तालुका प्रशासनाची मनमानी, ऑक्सिजन पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:10 IST

उरुळी कांचन : कोरोना महामारीतील जीवघेण्या ऑक्सिजन तुटवड्याच्या भीषण परिस्थितीत दौंड तालुका प्रशासनाने यवत (ता. दौंड) येथील एका ऑक्सिजन ...

उरुळी कांचन : कोरोना महामारीतील जीवघेण्या ऑक्सिजन तुटवड्याच्या भीषण परिस्थितीत दौंड तालुका प्रशासनाने यवत (ता. दौंड) येथील एका ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या प्लॅन्टमधून पूर्व हवेली तालुक्यात तसेच जिल्हातील इतर भागांत होणारा ऑक्सिजन पुरवठा मनमानी पद्धतीने (दि. २०) रात्री ८ पासून बंद करून मानवतेला काळिमा फासला आहे. दौंड तालुक्याच्या प्रशासनाच्या या भूमिकेने पूर्व हवेली तसेच जिल्हातील अनेक रुग्णालयांतील ऑक्सिजनचा पुरवठा १६ तासांहून अधिक काळ बंद राहिल्याने रुग्णालयात गोंधळ उडाला.

दौंड तालुक्यातील यवत येथे गुरुदत्त एंटरप्राइजेस नामक ६ टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लॅन्ट आहे. या ऑक्सिजन प्लँटमधून पूर्व हवेली तालुक्यात तसेच जिल्ह्यांतील अनेक भागांत ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे. मंगळवार (दि.२०) दौंड तालुका प्रशासनाने उर्वरीत भागातील पुरवठा बंद करुन केवळ दौंड तालुक्यातील सर्व रुग्णालयांतील ऑक्सिजनची कमरता बघता फक्त दौंड तालुक्यापुरता पुरवठा सुरू ठेवला आहे. या प्लॅन्टमधून संपूर्ण तालुक्याचा कोटा पूर्ण होईपर्यंत अघोषित आदेशच दौंड तालुका प्रशासनाने काढल्याने तब्बल १६ तासहून अधिक ऑक्सिजन पुरवठा (दुसऱ्या दिवशी ) म्हणजे बुधवार (दि.२१) पूर्व हवेली तालुक्यात खंडित झाला होता. १६ तासांहून अधिक काळ ऑक्सिजनच उपलब्ध न झाल्याने कोरोनाच्या महामारीत गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांवर उपचार कसा करावा, असा प्रश्न सर्व रुग्णालयांपुढे आ वासून उभा राहिला आहे.

जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी प्रवीण साळुंखे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की असे कोणीही करू शकत नाही, जिल्हाधिकारी यांनी याबाबत संबंधितांशी बोलून खात्री करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार हवेलीचे अतिरिक्त तहसीलदार विजयकुमार चोबे यांना परिस्थितीचे अवलोकन करून पुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनीही जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना या गंभीर समस्येबाबत लक्ष घालून ऑक्सिजनचा पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दौंड तालुक्यातील अनेक रुग्ण दौंडप्रमाणे हवेलीच्या उरुळी कांचन शहरात उपचार घेत आहेत. या ठिकाणी पुरवठा बंद ठेवून दौंडचा 'स्वाभिमान ' कमी होणार नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, दौंड प्रशासनाच्या या भूमिकेवर हवेलीकर संतप्त झाले असून, पुढील काळात रेमडेसिविर व ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास जिल्हाधिकाऱी कार्यालयावर ठिय्या मांडू, असा इशारा भाजपचे युवा नेते अजिंक्य कांचन यांनी दिला आहे.

“दौंड तालुक्यातून हवेलीसाठी होणारा ऑक्सिजन पुरवठा मंगळवारी (दि.२०) रात्रीपासून बंद असल्याची बाब खरी आहे. जिल्हाधिकारी यांना याबाबत कल्पना दिली आहे. त्यांच्या सूचनेनुसार हवेली तालुक्यातील अधिकाऱ्यांचे पथक घेऊन मी स्वतः या ऑक्सिजन प्लॅन्टमध्ये जाऊन पुरवठा सुरळीत करणार आहे. पुढील काही तासांतच तालुक्यातील पुरवठा सुरळीत होईल.” - विजयकुमार चौबे, अतिरिक्त तहसीलदार, हवेली