शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नियतकालिकांच्या वितरणासाठी पोस्टाकडून विशेष सवलतींना मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:10 IST

पुणे : सध्या संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर नियतकालिकांची छपाई आणि वितरण करण्यात ...

पुणे : सध्या संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर नियतकालिकांची छपाई आणि वितरण करण्यात मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत, याकरिता अखिल भारतीय मराठी नियतकालिक परिषदेने पोस्ट विभागाकडे आग्रही मागणी केली होती, त्यातील सर्व बाबींना मान्यता मिळाली असल्याची माहिती परिषदेचे सरचिटणीस भालचंद्र कुलकर्णी यांनी दिली.

केंद्रीय दळणवळण मंत्री रवी शंकर प्रसाद व केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला व मंजुरी मिळवून दिली आहे. यासंदर्भात पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी देखील प्रकाशकांच्या अडचणी सोडवल्या जाव्यात यासाठी विशेष पाठपुरावा केला होता, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

दिल्ली येथील पोस्ट विभागाच्या उपमहासंचालिका सुकृती गुप्ता यांनी जारी केलेल्या आदेशानुसार मार्च ते जुलै या ५ महिन्यांसाठी ऑगस्ट महिन्यापर्यंत कधीही वितरण करता येणार आहे. त्यामध्ये वितरणाच्या तारखेचे बंधन नसेल, जोड अंक काढता येईल तसेच अंक प्रकाशित झाला नसल्यास दंडात्मक कारवाई होणार नाही, तर वाढीव दराने पोस्टेज भरण्याची गरज आता राहिलेली नाही.

------------------------------

चौकट

कोरोनाची परिस्थिती वाढत असल्याने अनेक प्रिंटिंग प्रेस बंद आहेत, कागद उपलब्ध होत नाहीत, बांधणी यंत्रणा बंद आहेत याचा विचार करता अनेक प्रकाशकांना अंक तयार करता येत नाही किंवा वेळेत पोस्टात देता येत नाही. त्याचबरोबर जाहिराती मिळत नसल्याने प्रकाशकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या सर्वाचाच परिणाम म्हणून सुमारे 14 ते 15 हजार नियतकालिके सध्या नियमितपणे प्रसिद्ध केली जात नाहीत. महाराष्ट्रात एकूण 20 हजार नोंदणीकृत नियतकालिके आहे, त्यापैकी सध्या सुमारे 5 हजार नियतकालिके सुरू असून त्यातील 4 हजार नियतकालिकांकडे पोस्ट सवलतीचा परवाना असल्याचे भालचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

------------------------------------