दोन सत्रात प्रक्रिया पार पडली. त्यात पहिल्या सत्रात निवड झालेल्या उमेदवारांना ज्येष्ठतेनुसार आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदस्थापना देण्यात आली. त्यात कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) सहा, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) एक, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) एक, आरोग्य सेवक (पुरुष) सहा, आरोग्य सेवक (महिला) एक, ग्रामसेवक (कंत्राटी) सात, अंगणवाडी पर्यवेक्षिका एक, पशुधन पर्यवेक्षक १, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सहा, कनिष्ठ अभियंता दोन अशा एकूण ३३ पदे भरण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी भारत शेडगे, सामन्य प्रशासनाने उपमुख्यकार्यकारी अधिकारी एम.एस. घुले यांच्यासह आदी अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.