शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यासाठी पर्यावरण व्यवस्थापक नियुक्त

By admin | Updated: November 2, 2015 01:10 IST

शहरातील कचरा प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यासाठी पर्यावरण व्यवस्थापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय तांत्रिक समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

पुणे : शहरातील कचरा प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यासाठी पर्यावरण व्यवस्थापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय तांत्रिक समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. या कचरा प्रकल्पांच्या अडचणी सोडविण्यासाठी नारी संस्था तसेच नागपूर विद्यापीठातील आभियांत्रिकी संशोधन संस्थेची मदत घेतली जाणार आहे. कचरा प्रकल्पांची समस्या सोडविण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीला नागपूर विद्यापीठातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अतुल वैद्य, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे डॉ. संजय कांबळे, डॉ. रजनीश कुमार, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख किशोरी गद्रे, तसेच स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. कचरा प्रकल्पाच्या समस्येवर या वेळी चर्चा करून काही उपाययोजना सुचविण्यात आल्या.महापालिकने शहरातील ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी २ मोठे प्रकल्प व २१ बायोगॅस प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पांमधून पूर्ण क्षमतेने कचऱ्यावर प्रक्रिया न होणे, दुर्गंधी येणे, वीजनिर्मितीमध्ये अडचणी येणे, वारंवार पाते खराब होणे, अशा समस्या निर्माण होतात. त्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. पर्यावरण व्यवस्थापकांची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कचरा प्रकल्पांच्या समस्येवर मात करण्यासाठी याची मोठी मदत प्रकल्पांना होऊ शकणार आहे. उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यास गावकऱ्यांकडून विरोध होत असल्याने शहरातील कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर प्रभागातील कचरा प्रभागातच जिरवावा ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याकरिता कचऱ्यावर प्रक्रिया करणारे छोटे-छोटे प्रकल्प उभारले जात आहेत.