शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर आणखी एक गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आपल्यावर जीवघेणा हल्ला केलेल्याची सुपारी देऊन पिस्तुले पुरविलेल्या व मोक्काअंतर्गत कारवाई केलेला भाजपचा माजी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आपल्यावर जीवघेणा हल्ला केलेल्याची सुपारी देऊन पिस्तुले पुरविलेल्या व मोक्काअंतर्गत कारवाई केलेला भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अकबर पिरसाब शेख (वय ३५, रा. पानसरेनगर, येवलेवाडी) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विवेक यादव व त्याच्या ८ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा प्रकार कॅम्पमधील जान मोहम्मद स्ट्रीटवरील १५ ऑगस्ट चौकाजवळील कणसे गॅरेजसमोर ९ जानेवारी २०२० रोजी घडला होता.

शेख हा मोटारसायकलवरून जात असताना आरोपी मोटारसायकलवरून आले. त्यांनी शेख याला थांबवले. विवेक यादव याने त्यांना शिवीगाळ करून कोयता दाखवून विवेक भाईविरोधात अर्ज केला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.

याबाबत फिर्यादी यांनी लष्कर पोलीस ठाणे व पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादी व आरोपी यांना समोरासमोर बोलावले होते. आरोपी समोर येण्यास घाबरल्याने त्यांनी तक्रार दिली नव्हती. आता पोलिसांनी कारवाई केल्यानंतर ते तक्रार देण्यास पुढे आले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशावरून विवेक यादव याच्यावर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली.