शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

निनावी दूरध्वनीमुळे बालविवाह रोखला

By admin | Updated: May 13, 2017 04:59 IST

बालविकास अधिकाऱ्यांच्या चातुर्याने पोलिसांच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात यश आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहडपसर : बालविकास अधिकाऱ्यांच्या चातुर्याने पोलिसांच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात यश आले. दूरध्वनीवरून मिळालेल्या माहितीद्वारे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी ठोस पुरावे गोळा करून हा बालविवाह होणार असल्याचे पोलिसांना पटवून दिले. त्यानंतर पोलिसांनी विवाह रोखण्यास मदत केली.हडपसर गाडीतळावरील महात्मा फुले वसाहतीत राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीचा बोपोखेल येथील मुलाशी एका मंगल कार्यालयात सायंकाळी ५.३० वाजता विवाह होणार आहे, असे एका निनावी दूरध्वनीवरून बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. त्यानंतर विवाह रोखण्यासाठी मुलीची जन्मतारीख शोधण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. अंगणवाडीमधील रजिस्टरमध्ये त्या मुलीचा २००१मध्ये जन्म झाल्याची नोंद मिळाली. मात्र, त्या मुलीच्या घरच्यांनी महापलिकेतील जन्माचा दाखला सादर करून ती सज्ञान असल्याचे सिद्ध केले. त्यामध्ये जन्मसाल १९९८ असे लिहिलेले होते. मात्र, बालविकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना त्या मुलीच्या आई-वडिलाचा लग्नातील फोटो हाती लागला. त्या फोटोच्या मागे लग्नाची तारीख दिसत होती. १९९९ ही लग्नाची तारीख असल्याने लग्नाआधी मुलीचा जन्म कसा झाला? असा प्रश्न उपस्थित झाला. फोटोवरील लग्नाच्या तारखेने पालिकेने दिलेला दाखला खोटा असल्याचे सिद्ध झाले. असे भक्कम पुरावे घेऊन पोलीस निरीक्षक फुगे यांच्याकडे बालविकास प्रकल्प अधिकारी रोहिणी ढवळे, मुख्य सेविका स्वाती पथाडे, अ‍ॅड. असुंता पारधे हे गेले. मात्र, त्यांनी टाळटाळ केल्याने शुक्रवारी दुपारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांची या अधिकाऱ्यांनी पुराव्यासह भेट घेतली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने हा बालविवाह रोखण्यात आला. पोलिसांनी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करू नये, अशी नोटीस बाजावली.