शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

चाकण नगर परिषदेची पहिली निवडणूक जाहीर

By admin | Updated: September 30, 2015 01:32 IST

राज्य निवडणूक आयोगाने नव्याने अस्तित्वात आलेल्या चाकण नगर परिषदेची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक व जुन्नर, भोर आणि इंदापूर नगर परिषदांच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने नव्याने अस्तित्वात आलेल्या चाकण नगर परिषदेची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक व जुन्नर, भोर आणि इंदापूर नगर परिषदांच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. येत्या १ आॅक्टोबरपासून ही निवडणूक प्रक्रिया सुरू होत असून, १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.चाकणच्या सार्वत्रिक व जुन्नर, भोर आणि इंदापूर नगर परिषदांच्या पोटनिवडणुकीसाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सोमवारी अधिसूचना जाहीर केली. यानुसार १ ते ८ आॅक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज स्विकारणे, ९ आॅक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी करणे, १९ आॅक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर १ नोव्हेंबरला मतदान होऊन २ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. पुणे जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या चाकण नगरपरिषदेची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होत असून, खेड तालुक्यात राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या निवडणुकीत आजी-माजी आमदारांमध्ये राजकीय रणधुमाळी रंगणार आहे.चाकणच्या २३ जागांसाठी व इंदापूर नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक ३-ड, भोर- प्रभाग क्रमांक ४-ड आणि जुन्नर-प्रभाग क्रमांक २-अ साठी पोटनिवडणूक होत आहे. (प्रतिनिधी)------------१ ते ८ आॅक्टोबर : अर्ज भरणे ९ आॅक्टोबर : छाननी १९ आॅक्टोबर : माघार ३० आॅक्टोबर : वैध अर्ज जाहीर,चिन्हवाटप.१ नोव्हेंबर : मतदान २ नोव्हेंबर : मतमोजणी ---------------भोर नगरपलिकाच्या प्रभाग क्रमांक ४ (ड)च्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी भोरच्या माजी नगराध्यक्षा दीपाली शेटे यांचे नगरसेवकपद रद्द केल्याने निवडणूक जाहीर झाली आहे.------------चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली. मात्र, प्रभाग रचना व मतदार यादीतील घोळ संपला नसल्याने अनेक जण निवडणुकीच्या कार्यक्रमासंदर्भात न्यायालयात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रभाग रचना व मतदार यादीतील नोंदी याबाबत संबंधितांनी आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रभाग रचनेची सुरुवात उत्तर पूर्वच्या मध्य ईशान्य कोपऱ्यातून करण्याऐवजी पश्चिम बाजूने केली असल्याने प्रभागरचना सदोष असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे अतुल देशमुख व राजन परदेशी यांनी व्यक्त केले.