शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त नीरादेवघर धरणग्रस्तांनी पाणी रोखले

By admin | Updated: November 23, 2015 00:54 IST

नीरादेवघर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंर्दभात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने रविवारी नीरादेवघर धरणातून सिंचनासाठी खाली सोडलेले

भोर : नीरादेवघर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंर्दभात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने रविवारी नीरादेवघर धरणातून सिंचनासाठी खाली सोडलेले पाणी व सुरू असलेले उजव्या कालव्याचे काम नीरादेवघर धरणग्रस्त पुनर्वसन शेतकरी संघटनेने बंद केले. आक्रमक झालेल्या धरणग्रस्तांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही दिला आहे. सकाळी आठ वाजता पाटबंधारे विभागाकडून नीरादेवघर धरणातून ७५० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडण्यात आले होते. ते पाणी नीरा नदीने आपटी गावापर्यंत आल्यावर धरणग्रस्तांच्या लक्षात आल्यावर संघटनेचे अध्यक्ष बाळासोा मालुसरे, चिमण शिरवले, हनुमंत कंक, लक्ष्मण धामुणसे, किसन दिघे, नथू दिघे यांनी धरणातून सोडलेले पाणी बंद केले. आमच्या मागण्यांची पूर्तता करा, मगच पाणी खाली सोडा, अशी मागणी त्यांनी केली.२६ आॅक्टोबरला विविध मागण्यांसाठी नीरादेवघर धरणग्रस्त पुनर्वसन समितीच्या वतीने धरणावर काम बंद आंदोलन करण्यात आले. त्या वेळी पाटबंधारे विभागाकडून मागण्यांसंदर्भात ५ नोव्हेंबरला पुण्यात जिल्हा पुनर्वसन अधिकारी व संबंंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे लेखी कार्यकारी अभियंता पवार यांनी दिले. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. मात्र ती बैठक झालीच नाही. ती पुढे ढकलून १९ नाव्हेंबर तारीख देण्यात आली. तीही बैठक झाली नाही. वीस वर्षांपासून नीरादेवघर धरणग्रस्तांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. धरणग्रस्तांची फसवणूक झाली असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.