पुणे: भंडारा अग्निकांड आणि बदायूं अत्याचारातील दोषींवर कारवाईची करण्याची मागणी करत मंगळवारी (दि. १२) अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने महिला व बाल विकास उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
अंगणवाडी सेविकांना म्हातारपणाचा आधार म्हणून नोकरीतील अखेरच्या मानधनाच्या निम्मी रक्कम दरमहा निवृत्ती वेतन म्हणून द्यावी, या मागणीसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या हडपसर प्रकल्प कार्यालयावर धरणे आंदोलनही करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष नितीन पवार यांनी अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले. कल्याणी दुर्गा रवींद्र, जितेंद्र फापाळे, बापू कांबळे हे आंदोलनात सहभागी झाले होते. निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे आणि बालविकासच्या परिविक्षाधीन अधिकारी विद्या धेंडे यांनी सुनीता खानोलकर, सुनंदा साळवे, अँड. मोनाली चंद्रशेखर अपर्णा, अनिता आवळे, राजश्री कालेलकर आदींनी दिलेेले निवेदन स्विकारले.