शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

आमडेची जागा व घरांबाबत संभ्रम

By admin | Updated: July 25, 2015 05:04 IST

माळीणचे पुनर्वसन होत असलेल्या आमडेच्या जागेबाबत ग्रामस्थांच्या मनात संभ्रम आहे. माळीण गावावर ढाळसलेला डोंगर व हा डोंगर एकच आहे;

घोडेगाव : माळीणचे पुनर्वसन होत असलेल्या आमडेच्या जागेबाबत ग्रामस्थांच्या मनात संभ्रम आहे. माळीण गावावर ढाळसलेला डोंगर व हा डोंगर एकच आहे; मग येथे पुन्हा अशी घटना घडली तर काय? या जागेमध्ये दर लागत नाहीत मग घरे पक्की कशी राहणार? घरे चाळीसारखी बांधली जाणार आहेत; मग जनावरे कुठे बांधायची? असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत आहेत. माळीणची दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने अडिवरे, झांजरेवाडी व कोकणेवाडी या तीन जागा पाहिल्या; परंतु त्यांतील एकही जागा निश्चित होऊ शकली नाही. त्यानंतर कशाळवाडीची जागा पाहिली; पण येथे ८ एकर जागा मिळू शकली नाही म्हणून चिंचेचीवाडी व आमडे येथील दोन जागा पाहण्यात आल्या. यातील आमडे जागेला ग्रामस्थ, जीएसआय अशी सर्वांनी सहमती दिली. परंतु, त्यानंतर ग्रामस्थांमध्ये या जागेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जिओलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाच्या लोकांनी पाहणी केली असता तेथे दर लागत नाहीत, खोल खोदले तरी माती, मुरूमच लागतो. त्यामुळे घरे बांधणे धोकादायक आहे, असे जीएसआयच्या काही लोकांनी ग्रामस्थांना सांगितले. दोन घरांची भिंत एकच असेल. एकाच भिंतीवर दोघांचे आडे असले, तर कसे होईल? तसेच ९ इंची वीट बांधकाम धरले आहे. असे बांधकाम झाले तर भिंतींमध्ये पाणी झिरपून घरात ओलावा तयार होईल. पावसाळ्यात या घरांमध्ये राहता येणार नाही. तसेच, आम्हाला दिला जाणाऱ्या दीड गुंठ्याच्या प्लॉटमध्ये घरे वेगवेगळी बांधून हवी आहेत. कारण आम्हाला कोंबड्या, शेळ्या पाळाव्या लागतात, सरपण भरावे लागते. जर तुम्ही चाळ बांधली तर हे सगळे कुठे ठेवणार? पूर्वीच्या गावामध्ये झांजरे, पोटे, लेंभे यांची घरे एकत्र होती. जर ड्रॉ पद्धतीने वाटप झाले, तर कोणी कुठेही जाईल. पहिल्यापासून एकत्र राहणारे लोक वेगवेगळे राहू शकणार नाहीत, अशा स्वरूपाच्या शंका व भीती माळीण ग्रामस्थ मांडत आहेत.