शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव राष्ट्रवादीच्या ताब्यात

By admin | Updated: February 24, 2017 02:12 IST

आंबेगाव तालुका जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले असून, पंचायत

नीलेश काण्णव/ घोडेगावआंबेगाव तालुका जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले असून, पंचायत समितीमध्ये १०पैकी राष्ट्रवादीला ६ जागा, ३ जागा शिवसेना तर १ जागा अपक्ष निवडून आला आहे. जिल्हा परिषदेमध्ये ५ पैकी ४ राष्ट्रवादी काँग्रेस, तर १ शिवसेनेकडे गेली आहे. पंचायत समिती सभापतिपद हे ओबीसी महिलासाठी आरक्षित असून, या जागेवर राष्ट्रवादी काँगे्रसच्या कळंब गणातून एकमेव उषा रमेश कानडे या निवडून आल्या असल्याने त्यांना संधी मिळू शकणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीने अघाडी घेतली असली तरी आमोंडी/शिनोली या हक्काच्या गटात शिनोली गणात निसटता विजय मिळविला. पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक/अवसरी बुद्रुक गटातील अवसरी बुद्रुक गटात पराभव झाला. या हक्काच्या भागात राष्ट्रवादीला अपयश आले. तर घोडेगाव/पेठ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला गट शिवसेनेला ताब्यात ठेवण्यात यश आले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेत गेल्यापासून हा गट त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आहे.या गटात त्यांचे स्वत: लांडेवाडी हे गाव व त्यांचा प्रभाव असणारी इतर गावे आहेत. मंचर गणात शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बाजूला ठेवत मतदारांनी राजाराम बाणखेले या अपक्ष उमेदवाराला विजयी केले. दोन्ही नेत्यांना येथील मतदारांनी धक्का दिला. तालुक्याच्या पाच गटांतील आमोंडी/शिनोली गटात रूपा जगदाळे यांना विक्रमी अशा ४९४७ फरकाने मतदारांनी निवडून दिले. घोडेगाव/पेठ गटात देविदास दरेकर हे अवघ्या ३५७ मतांच्या फरकाने निवडून आले. तसेच कळंब/चांडोली बुद्रुक गटात तुलसी भोर या १००८ मतांच्या फरकाने तर मंचर/अवसरी खुर्द गटातील अरुणा थोरात या २३०३ मतांच्या फरकाने निवडून आल्या. तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक/अवसरी बुद्रुक गटात विवेक वळसे पाटील हे अरुण गिरे यांच्यापेक्षा १५९१ मतांच्या फरकाने निवडून आले.दहा पंचायत समिती गणातील पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक गणातून संजय गवारी हे विक्रमी अशा २७०८ मतांनी निवडून आले, तर अवसरी खुर्द गणात संतोष भोर हे २०३७ मतांनी, कळंब गणात उषा कानडे या १९२४ मतांनी निवडून आल्या, तर पेठ गणात शीतल तोडकर या १७०० मतांनी निवडून आल्या. (वार्ताहर)