शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रशस्त जेएम रोडचा बट्ट्या‘बोळ’

By admin | Updated: May 15, 2017 06:48 IST

पुण्यातील प्रशस्त आणि सर्वाधिक उत्तम स्थितीतील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्याचा बोळ करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू झाले आहे.

विश्वास खोड। लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुण्यातील प्रशस्त आणि सर्वाधिक उत्तम स्थितीतील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्याचा बोळ करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना होणाऱ्या प्रशस्त फुटपाथमुळे १०० फुटी रस्ता असे बिरुद मिरवणारा जंगलीमहाराज रस्ता चिंचोळा बोळ होणार आहे. याबाबत आता स्थानिक नागरिकच आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. पुणे महापालिकेने स्मार्ट सिटी होण्यासाठी अनेक योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी परदेश दौरे केले. परदेशातील प्रशस्त फुटपाथ, तेथून निवांतपणे पायी जाणारे नागरिक आणि तेथील आल्हाददायक वातावरण पाहून महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पुण्यातही हेच चित्र उभारण्याचे ठरविले आहे. त्यासाठी संभाजीमहाराज उद्यानाच्या परिसरातील जंगलीमहाराज रस्त्याची निवड करण्यात आली आहे. रस्त्याच्या एका बाजुला सुंदर फुटपाथ करण्यात आला आहे. विविध आकर्षक झाडे लावण्यात आली आहेत. यामुळे या रस्त्यावरील पार्किंगची व्यवस्था बंद झाली आहे. आता रस्त्याच्या दुसऱ्या बाजुलाही याच पद्धतीचा फुटपाथ सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आताच येथे वाहतूककोंडीला सुरुवात झाली आहे. एकेरी रस्ता असूनही सायंकाळच्या वेळी वाहनांच्या रांगाच्या रांगा लागत आहे. या रस्त्याच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती सदस्य श्रीकांत शिरोळे म्हणाले, ‘‘पुण्यात पूर्वी बोळवजा रस्ते खूप होते. जंगलीमहाराज रस्ता ८० फुटी रोड म्हणून १९७० च्या दशकात प्रसिद्ध होता. नंतर त्याचे रुंदीकरण करून १०० फूट रुंद करण्यात आला. रुंद होऊनही त्याच्यावर वाहतूककोंडीची समस्या कायम आहे. अशा स्थितीमध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली जंगलीमहाराज रस्त्याचे रूपांतर महानगरपालिकेने बोळामध्ये केले आहे.’’‘लोकमत’शी बोलताना शिरोळे म्हणाले, ‘‘१९७५ मध्ये मी स्थायी समितीवर होतो. रिकांडो कंपनीने या रस्त्याच्या डांबरीकरणाचे कंत्राट १० लाख रुपयांमध्ये स्वीकारले. १ जानेवारी ७५ ते ८५ दरम्यान या रस्त्याला एकही भेग पडली तर रस्ता विनामूल्य दुरुस्त करून देऊ, अशी हमी या कंपनीने दिली होती. त्यामुळे हा रस्ता खड्डेविरहीत रस्ता म्हणूनही अनेक वर्षे स्मरणात होता. ८० फूट रस्ता असताना दुहेरी वाहतूक होती. नंतर १०० फूट झाल्यानंतर वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे एकेरी वाहतूक करूनही वाहतूककोंडी होतच राहिली. पूर्वी या रस्त्यावर बंगले असल्याने वाहनांची वर्दळ कमी होती. या बंगल्यांचे व्यावसायिक रूपांतर झाल्याने येणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे १०० फूट असलेला रस्ताही अरुंद बनला. आता त्यात सुशोभीकरणाची भर पडून तो आणखी अरुंद केला गेला. केवळ २ किलोमीटरचा रस्ता सुशोभित करून सबंध शहरातील सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचे महापालिका आयुक्तांचे आयुक्तांचे तार्किक मला समजलेले नाही. रस्त्याचे सुशोभीकरण करण्यापूर्वी नागरिकांचा परिसंवाद घेणे, त्यांची मते घेणे आवश्यक होते. त्यातच मेट्रोसाठी सुशोभीकरण उखडून टाकणार, अशी चर्चा आहे. असे असेल तर अवाढव्य खर्च कशासाठी? पिंपरी-चिंचवडमधील रस्ते बऱ्यापैकी कोंडीमुक्त आहेत. पुण्यातील उपनगरांकडे जाणारे मोठे रस्ते सायंकाळी वाहतुकीने प्रचंड गजबजलेले असतात. पाऊण तासाशिवाय या रस्त्यावरुन पुढे सरकतच येत नाही. - श्रीकांत शिरोळे, माजी स्थायी समिती सदस्य