शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

खोदाईसाठी सर्व नियम धाब्यावर

By admin | Updated: May 13, 2017 04:55 IST

महापालिका प्रशासनाने एल अ‍ॅँड टी कंपनीसाठी सर्व नियम धाब्यावर बसविले आहे. शहरामध्ये सेवा वाहिन्या टाकण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिका प्रशासनाने एल अ‍ॅँड टी कंपनीसाठी सर्व नियम धाब्यावर बसविले आहे. शहरामध्ये सेवा वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम करण्यास ३० एप्रिलपर्यंतच परवानगी देण्याचे महापालिकेचे धोरणच असताना या कंपनीला ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने शहरात सेवावाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम करणाऱ्या कंपन्यांना ३० एप्रिलपर्यंत परवानगी देण्याचे महापालिकेने खास धोरण निश्चित केले आहे. परंतु, महावितरण आणि गॅस वाहिन्या टाकणाऱ्या एमएनजीएल कंपनीला अत्यावश्यक सेवा म्हणून ही खोदाई करण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. याच अत्यावश्यक सेवेचे निकष स्मार्ट सिटी अंतर्गत शहरामध्ये ‘वाय-फाय’ सुविधा पुरविण्याचे काम देण्यात आलेल्या एल अ‍ॅँड टी कंपनीच्या खोदाईसाठी लावण्यात आला आहे. शहराला ‘वाय-फाय’ सुविधा पुरवण्याचे कामदेखील अत्यावश्यक सेवा असल्याचे सांगत कंपनीलादेखील ३१ मेपर्यंत खोदाई करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या तिन्ही कंपन्या सुमारे शंभर किलोमीटरचे खोदकाम करणार असल्याचे पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. शहरात गेल्या काही वर्षांत मोबाईल; तसेच शासकीय कंपन्यांकडून भूमिगत सेवावाहिन्या टाकणे सुरू आहे. यासाठी तब्बल ८ महिने या कंपन्या शहरात खोदकाम करतात. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने शहरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था होते. या बेसुमार खोदकामांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने दोन वर्षांपूर्वी खास खोदाई धोरण तयार केलेले आहे. यानुसार, पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती आवश्यक असल्याने ३० एप्रिलपर्यंतच खोदकाम परवानगी दिली जाते. त्यानंतर संपूर्ण मेमध्ये दुरुस्ती केली जाते. त्यानंतर केवळ एखादे अत्यावश्यक काम आले, तरच खोदकामास मान्यता देण्याचे विशेष अधिकार अतिरिक्त आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना आहेत. अत्यावश्यक सेवेतही पाणी, ड्रेनेज, तसेच भूमिगत विद्युत वाहिन्यांचा समावेश आहे. त्यामुळे ३० एप्रिल रोजी पथ विभागाने संपूर्ण शहरातील खोदकाम थांबवले; मात्र महावितरण आणि एमएनजीएल या दोन कंपन्यांना अत्यावश्यक बाब म्हणून ३ मेपर्यंत खोदकामास मान्यता दिली; मात्र त्यावेळी ‘वाय-फाय’ साठी शहरात सुमारे ५२ किलोमीटरचे खोदकाम करणा-या एल अँड टीलाही अत्यावश्यक बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे.