शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

सर्व पक्ष स्वबळावर

By admin | Updated: February 4, 2017 03:57 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, काँग्रेसने जिल्हा परिषद गटासाठीची ७५पैकी १५ जागांची पहिली

पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, काँग्रेसने जिल्हा परिषद गटासाठीची ७५पैकी १५ जागांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर मात्र जिल्ह्यात काँग्रेससह सर्व प्रमुख पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. अर्ज भरण्यास बुधवारपासून (दि. १) सुरुवात झाली आहे. गुरुवारपर्यंत कोणत्याही पक्षाने आपली उमेदवार यादी जाहीर केली नव्हती. बंडखोरी होण्याची शक्यता पाहता सर्वच पक्ष ‘पहिले आप, पहिले आप’ करत यादी जाहीर करत नव्हते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांनीही १ फेब्रुवारीला यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनीही यादी जाहीर केली नाही. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखतींना आलेल्या इच्छुकांची संख्या बघता आधीच यादी जाहीर केली तर बंडखोरी होण्याची मोठी शक्यता आहे, त्यामुळे त्यांनीही ‘वेट अँड वॉच’चे धोरण ठेवले असून, ६ फेब्रुवारीपर्यंत यादी जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.शुक़्रवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मात्र पत्रकार परिषद घेत आपली जिल्हा परिषद गटासाठीची १५ उमेदवारांची यादी जाहीर केली. निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. या यादीत वेल्हे तालुक्यातील कुरण खुर्द विंझर या सर्वसाधारण गटातून काँग्रेसच्या विद्यमान सदस्या वसुधा नलावडे यांचे पती अमोल नलावडे यांना तर भोर तालुक्यातील कारी उत्रौली या सर्वसाधारण गटातून विद्यमान सदस्या गीतांजली आंबवले यांचे पती आनंद आंबवले यांना उमेदवारी मिळाली असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्जही भरला आहे. तसेच पुरंदरचे पंचायत समिती सदस्य दत्तात्रय झुरूंगे यांना बेलसर-माळशिरस या नागरिकांच्या मागास प्रवर्ग गटासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)तिसरी आघाडीही अधांतरीराष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला बारामती काबीज करण्यासाठी भाजपाने विशेष लक्ष केंद्रित केले. परंतु, शिवसेना-भाजपाची युती संपुष्टात आली. त्यानंतर रासप, स्वाभिमानी शेतकरी हे एकत्रीत येऊन तिसरी आघाडी करून राष्ट्रवादीविरोधात निवडणूक लढण्याची रणनीती आखत होते. मात्र अद्याप याबाबत एकमत झाल्याचे दिसत नाही.दौंड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय समाज पक्ष यांची युती झाल्याचे समजते. रासपला कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून, शुक्रवारीही याबाबत बैठक घेण्यात आली.