शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

चांदणी चौकात रात्रभर ‘दम मारो दम’

By admin | Updated: May 21, 2014 00:02 IST

शहरातील राजकीय क्षेत्रातील नामांकित लोकांच्या नावावर चांदणी चौकातील बीडीपीच्या भागात सुरू करण्यात आलेल्या बेकायदेशीर हॉटेल्समध्ये रात्रभर ऐश दरबार सुरू असतो.

पुणे : शहरातील राजकीय क्षेत्रातील नामांकित लोकांच्या नावावर चांदणी चौकातील बीडीपीच्या भागात सुरू करण्यात आलेल्या बेकायदेशीर हॉटेल्समध्ये रात्रभर ऐश दरबार सुरू असतो. रात्रभर सुरू असलेल्या मद्य अन् हुक्कांच्या पार्ट्यांना हिंंजवडी पोलिसांनीच अभय दिल्याचे धक्कादायक वृत्त आहे. पुण्याबाहेरील तरुणांचे जथ्थेच या भागात रात्रभर झिंंगत आहेत. या भागात अतिक्रमण करून व्यवसाय करणार्‍यांवर महापालिका कारवाई करीत आहे. आजपर्यंत हिंंजवडी पोलिसांनी मात्र एकदाही बेकायदा दारूविक्री अन् हुक्काविक्री करणार्‍यांवर कारवाई केली नाही. याउलट महापालिकेच्या कारवाईनंतर या भागातील हॉटेल्स व्यावसायिकांना रात्रभर हॉटेल्स सुरू ठेवण्याचा अलिखित परवानाच दिला जात आहे. या भागात हॉटेल व्यवसाय करणार्‍या लोकांमध्ये पुणे शहरातील राजकीय क्षेत्रातील बड्या लोकांची नावे असल्याने या भागात पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. या व्यावसायिकांनी वर्षानुवर्षे हितसंबंध जोपासल्यामुळे पोलीस कारवाई केली जात नसून, उलट पोलिसांच्या १०० क्रमांकाच्या तक्रारींनाही दिशाभूल करणारी उत्तरे देऊन पाठबळ देण्याचे काम केले जात आहे. हिंंजवडी पोलिसांच्या वतीने या भागात चारचाकी वाहनांतून गस्त घालण्यात येत असली तरी गस्तीची वाहनेही टोलनाक्यांच्या पुढे जात नसल्याने हॉटेल्स व्यावसायिकांवर कारवाई केलीच जात नाही. चांदणी चौकापासून पौड रस्ता हिंंजवडी पोलिसांच्या हद्दीत अनेक हॉटेल्स असून, यामधील सर्वच हॉटेल्समधून मद्याची सर्रास विक्री केली जात आहे. या भागातील हॉटेल्स व्यावसायिकांनीही पोलिसांशी संगनमत केल्यानेच पोलीस कारवाई केली जात नाही. याबाबत हिंंजवडी पोलिसांच्या वतीने रात्री १२ पासून गस्त सुरू असून, गस्तीची वाहने नियमित फिरत असल्याचे कायदेशीर उत्तर दिले जात आहे. (प्रतिनिधी))