शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच उमेदवारांचा लागणार कस

By admin | Updated: February 13, 2017 02:23 IST

नव्याने झालेली प्रभागरचना, पक्षबदल, मतदारांची सरमिसळ या कारणांमुळे जनता वसाहत-दत्तवाडी (प्रभाग क्रमांक ३०) या प्रभागात सर्वच पक्षांतील उमेदवारांचा कस

पुणे : नव्याने झालेली प्रभागरचना, पक्षबदल, मतदारांची सरमिसळ या कारणांमुळे जनता वसाहत-दत्तवाडी (प्रभाग क्रमांक ३०) या प्रभागात सर्वच पक्षांतील उमेदवारांचा कस लागणार आहे. या प्रभागात एकूण २३ उमेदवार असून त्यात केवळ सहा अपक्षांनी आव्हान उभे केले आहे. एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतेक उमेदवार नवखे आहेत. सद्य:स्थितीत कोणत्याही एका पक्षासाठी हा प्रभाग अनुकूल असल्याचे चित्र नाही.पालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत दत्तवाडी आणि जनता वसाहत हे दोन्ही भाग वेगळ्या वॉर्डमध्ये होते. आता नव्याने झालेल्या प्रभागरचनेत संपूर्ण जनता वसाहत व दत्तवाडीतील बराचसा भाग एकत्रित करून प्रभाग तयार करण्यात आला आहे. मागील निवडणुकीत दत्तवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पसंती देण्यात आली होती, तर जनता वसाहतीमध्ये मनसे उमेदवाराने अधिक मते घेतली होती. जयदेवनगर व लगतच्या परिसरात भाजपाचा वरचष्मा राहिला आहे. प्रभागरचनेमध्ये सर्व पक्षांची गणिते बदलली आहेत. काही उमेदवारांनी आयत्या वेळी पक्षबदल करून तिकीट मिळविले आहे, तर काही उमेदवार नवखे असल्याने त्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.या प्रभागात गट ‘अ’मध्ये नगरसेवक राहुल तुपेरे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैशाली चांदणे आणि भाजपाचे आनंद रिठे, काँग्रेसचे शंकर ढावरे आणि शिवसेनेचे शिवाजी दादू माने यांचे आव्हान आहे. चांदणे व रिठे यापूर्वी अनुक्रमे भारिप व राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होते. तसेच भारिप-बहुजन महासंघाकडून विकास लोंढे यांच्यासह अपक्ष म्हणून राकेश भोसले, किरण ओहोळ, महेश सकट आणि अतुल सावंत हे लढत आहेत. ‘ब’ गटात मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या प्रिया गदादे आणि भाजपाच्या पुष्पमाला शिरवळकर यांच्यात थेट लढत होणार आहे. तसेच अपक्ष उमेदवार कलावती भाटी यांच्याव्यतिरिक्त अन्य उमेदवार रिंगणात नाहीत. ‘क’ गटातही प्रमुख पक्षांतच चौरंगी लढत रंगणार आहे. राष्ट्रवादीच्या अर्चना हनमघर, भाजपाच्या अनिता कदम, शिवसेनेच्या सुप्रिया कदम आणि भारिपच्या पंचशील कुडवे यांच्यात लढत होणार आहे. ‘ड’ गटात काँग्रेसमधून भाजपात गेलेले शंकर पवार, काँग्रेसचे प्रवीण चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रेमराज गदादे, शिवसेनेचे सूरज लोखंडे आणि बहुजन समाज पक्षाचे अरविंद लोंढे यांच्यात पंचरंगी लढत होईल. अश्रफ बरकतअली आलमेल हे अपक्ष म्हणून लढत देत आहेत. (प्रतिनिधी)