शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी, गर्दुल्यांचा अड्डा

By admin | Updated: February 13, 2017 01:43 IST

शहराच्या मध्यभागी असलेले नगर परिषदेचे प्रियदर्शनी संकुल मागील काही काळापासून दारुडे व गर्दुले यांचा अड्डा बनले आहे.

लोणावळा : शहराच्या मध्यभागी असलेले नगर परिषदेचे प्रियदर्शनी संकुल मागील काही काळापासून दारुडे व गर्दुले यांचा अड्डा बनले आहे. संकुलाच्या पायऱ्या व कोपरे दारूच्या बाटल्या व व्हाइटनरने भरलेल्या आहेत. मात्र नगर परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे कायम या संकुलाकडे दुर्लक्ष झाले असल्याने लाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या या संकुलाची वाताहत झाली आहे.गावठाण भागात नगर परिषदेने प्रियदर्शनी नावाने व्यापारी संकुलाची उभारणी १९९५मध्ये केली. व्यापारी गाळे, विविध कार्यालये, सांस्कृतिक सभागृह, नगर परिषद प्राथमिक शाळा, शिक्षण मंडळाचे कार्यालय, पतसंस्था या संकुलात आहेत. बांधकाम करताना योग्य खबरदारी घेतली न गेल्याने इमारतीच्या हॉलमध्ये आवाजाची समस्या निर्माण झाल्याने हे हॉल वापराविना बंद अवस्थेत होते. सहा महिन्यांपूर्वी शिवदुर्ग मित्र संस्थेने येथील बंद अवस्थेत असलेल्या सदरच्या हॉलमधून चार ट्रॉल्या कचरा बाहेर काढत मुलांकरिता इनडोअर गेम्स सुरू केल्या. मात्र, संकुलाची सुरक्षा रामभरोसे असल्याने सर्व कार्यालये बंद झाल्यानंतर संकुलाच्या परिसरात दारुडे, गर्दुले व अपप्रवृत्ती धारकांचा अड्डा भरतो. संकुलाच्या मोकळ्या जागा, पॅसेज, पायऱ्यांवर सर्रासपणे ही मंडळी नशा करतात. दारूच्या मोकळ्या बाटल्या व इतर वस्तू तेथेच टाकतात. ते पायऱ्यांवर लघुशंका करतात. संकुलाच्या सुरक्षिततेकरिता सुरक्षारक्षक नेमले आहेत. मात्र, ते दिवसा एक ठिकाणी व रात्री एक ठिकाणी काम करत असल्याने ते बहुधा झोपलेले असल्याचे पाहणीत आढळले.संकुलाचे विदारक चित्र मनविसेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. ‘लोकमत’नेही अनेकदा संकुलाच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रसिद्ध केली आहेत. संकुलाच्या परिसरात चुकीचे उद्योग करणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिले. (वार्ताहर)