शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीचा पाणीप्रश्न मार्गी लागणार

By admin | Updated: May 23, 2014 05:03 IST

४७ कोटींच्या आळंदी पाणी योजनेला मंत्रालयात झालेल्या बैठकीत नियोजन मंडळाने मान्यता दिली असून मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर योजना मार्गी लागणार आहे.

कडूस : ४७ कोटींच्या आळंदी पाणी योजनेला मंत्रालयात झालेल्या बैठकीत नियोजन मंडळाने मान्यता दिली असून मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर योजना मार्गी लागणार आहे. तसेच कडूस प्रादेशिक योजना दुरुस्तीसाठी ३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. मंगळवारी ( २० मे ) ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला. या निर्णयाने खेड तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदी या दोन महत्त्वाच्या मोठ्या गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. मंगळवारी मुंबई येथे ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल, राज्यमंत्री रणजित देशमुख, पाणीपुरवठा विभागाचे सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी यांच्या सोबत खेड तालुक्यातील राजगुरुनगर, आळंदी योजनांविषयी चर्चा झाली. शासनाने यापूर्वी आळंदीसाठी ३५ कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर केली आहे. सदर योजना रेंगाळल्यामुळे या योजनेचा खर्च वाढला. योजना मार्गी लागण्यासाठी सुधारित अंदाजपत्रक मंत्रिमंडळाकडून मंजूर होणे आवश्यक होते. काल झालेल्या संबंधित मंत्र्यांच्या बैठकीत यावर अखेर तोडगा निघाला. आळंदी नगरपालिकेसाठी ४७ कोटींची सुधारित अंदाजपत्रकीय रक्कम या वेळी मंजूर करून घेतली. यामुळे आळंदीची पाणी योजना मार्गी लागणार आहे. राजगुरुनगरसह पाच गावे आणि परिसराला उपयोगी असणार्‍या आणि बंद अवस्थेत असणार्‍या कडूस प्रादेशिक योजना दुरुस्तीसाठीही ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून योजना कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने पाइप बदलणे हे मुख्य काम करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे सदर योजना चालू राहावी आणि गावांचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी या योजनेच्या वीजबिलाची जबाबदारी ही जिल्हा परिषदेने घेतली आहे. कडूस प्रादेशिक योजना कार्यान्वित झाल्यास राजगुरुनगर चांडोली, शिरोली, राक्षेवाडी या गावांना या योजनेचा लाभ होणार आहे. दरम्यान, ही योजना राजगुरुनगरकडे हस्तांतरित करावी, अशी राजगुरुनगरची मागणी होती. त्याचप्रमाणे सदर योजनेचे २ कोटी रुपये थकीत वीजबिल शासनाने आश्वासन दिल्यानुसार भरावे, अशीही मागणी होती. राजगुरुनगर ग्रामस्थांचे यासाठी उपोषणही झाले होते. कडूस प्रादेशिक योजनेच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होणार असल्याने ही योजना कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (वार्ताहर)