पुणे : राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहारातील चौकशी अहवालात उपमुख्यमंत्री अजित पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह ५० जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची आणखी सखोल चौकशी होणे आवश्यक असून, अजित पवार हे पदावर असेपर्यंत चौकशी नि:पक्षपणाने होऊ शकणार नाही. त्यामुळे पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी शुक्रवारी केली. तावडे म्हणाले, की शिखर बँकेचा प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये सूतगिरण्यावर इतर सहकारी बँकांना बेहिशेबी पैसे वाटप केल्याचा ठपका आहे. मात्र, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणाची कालबद्ध सखोल चौकशी करून कारवाई केली पाहिजे. (प्रतिनिधी)
अजित पवार यांनी राजीनामा द्यावा
By admin | Updated: May 31, 2014 07:26 IST