शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने हवा ॲक्शन प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:14 IST

समाजातील विकृतींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आईच्या कुशीत असलेली तान्ही मुलगीही आजकाल सुरक्षित नाही. सर्वच वयोगटांतील महिला कमालीच्या असुरक्षिततेमध्ये ...

समाजातील विकृतींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आईच्या कुशीत असलेली तान्ही मुलगीही आजकाल सुरक्षित नाही. सर्वच वयोगटांतील महिला कमालीच्या असुरक्षिततेमध्ये जगत आहेत. शालेय वयापासून मुलींना कराटेसारखे प्रशिक्षण देण्याची गरज आहेच; मात्र सर्वात जास्त गरज आहे ती मुलांवर चांगले संस्कार करण्याची, स्त्रीसन्मानाचे धडे गिरवण्याची. ‘तू स्त्रीचा सन्मान केलाच पाहिजे’, ही बाब लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवण्याची गरज असते. मुलांसाठी असे वर्ग सुरू करणे, अभ्यासक्रमात याबाबतच्या शिक्षणाचा समावेश करण्याची नितांत गरज आहे.

दररोज बलात्काराची नवनवीन प्रकरणे समोर येत असताना पोलीस प्रशासनाकडे काही ‘ॲक्शन प्लॅन’ आहे की नाही, हेच कळायला तयार नाही. अनेकदा १०० क्रमांकावर संपर्क साधला तरी फोन उचललाही जात नाही. ‘प्रतिसाद’ ॲपचे पुढे काय झाले, हे माहीत नाही. शहरात विविध ठिकाणी सुमारे १५०० सीसीटीव्ही बसवले होते. ते कार्यरत आहेत की नाही, याबाबतही कल्पना नाही. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने यंत्रणांनी आता ठोस ॲक्शन प्लॅन तयार केला पाहिजे. दररोज अशा घटना घडत असतील तर त्यासंदर्भात काय पावले उचलली जात आहेत? केवळ निवेदने स्वीकारून बदल घडणार नाहीत, प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यासाठी बलात्काराच्या प्रकरणांतील आरोपींना कठोर शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले पाहिजे.

कोथरूडमध्येही दररोज टेकडीवर फिरायला जाणाऱ्या महिलांना वाईट अनुभव येतात. परवाच कोथरूडमध्ये एक ताई सकाळी ९ वाजता आपल्या लहान मुलाला घेऊन गोपीनाथनगर टेकडीवर लहान मुलाला घेऊन गेल्या असताना एका तरुणाने असभ्य वर्तन केले. अशा घटना वारंवार घडत असूनही ठोस पावले उचलली जात नाहीत. महिलांची सुरक्षितता, त्यांचा स्वाभिमान, त्यांची अस्मिता जपली जाणार आहे की नाही, असा प्रश्न पडतो. बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांपैकी किती जणांचे व्हेरिफिकेशन केले जाते, याचा आकडा पोलिसांकडे नाही. बाहेरुन आलेल्या आणि भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांची एकत्रित नोंद उपलब्ध नाही. महिलांच्या सुरक्षेशी संबंधित सर्व उपाययोजना यंत्रणेकडून तातडीने झाल्या पाहिजेत. बलात्कार प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेऊ नका, असे आवाहन ॲड. वैशाली चांदणे यांनी वकिलांना केले आहे, याबाबत मी त्यांचे अभिनंदन करते. विकृत मानसिकतेच्या लोकांना आणि यंत्रणेला ‘ती’चा गणपती सदबुद्धी देवो, हीच प्रार्थना!

--------------------------------