शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाणी, ऊर्जा क्षेत्र संशोधनासाठी करार

By admin | Updated: April 26, 2015 01:15 IST

‘ब्रिक्स’ देशांच्या अनुदानातून ‘युनिव्हर्सिटी आॅफ साऊथ आफ्रिका’ (युनिसा) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी करार करणार आहे.

पुणे : पाणी व ऊर्जेच्या क्षेत्रात भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर संशोधन करण्यासाठी ‘ब्रिक्स’ देशांच्या अनुदानातून ‘युनिव्हर्सिटी आॅफ साऊथ आफ्रिका’ (युनिसा) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी करार करणार आहे. या कराराच्या माध्यमातून नॅनो टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने पाणी व उर्जेच्या क्षेत्रात भरीव संशोधन करण्याचा प्रयत्न आहे.‘ब्रिक्स’ देशांचे शिष्टमंडळ भारतासह चीन, दक्षिण आफ्रिका या देशांच्या दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळाने विद्यापीठालाही भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत ही संकल्पना स्पष्ट केली. शिष्टमंडळामध्ये युनिसाच्या संशोधन विभागाचे उपप्राचार्य प्रा. एम. फाकेंग, पाणी संशोधन विभागाचे प्रा. बी. मंबा, नॅनोसायन्स अ‍ॅन्ड नॅनोटेक्नॉलॉजी विभागाचे प्रा. एम. माझा आणि प्रा. व्ही. व्ही. श्रीनिवासु यांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. के. सी. मोहिते यांच्या प्रयत्नातून करार होणार आहे.भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांतील विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांमध्ये पाणी, उर्जा, सौर उर्जा आणि विविध क्षेत्रात नॅनो टेक्नॉलॉजी व नॅनो सायन्सचा वापर करून संशोधनाला चालना देण्याचे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याविषयी बोलताना डॉ. फाकेंग म्हणाल्या, पाणी, उर्जा, कचरा व्यवस्थापन अशा काही समान समस्या भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी संशोधनाच्या माध्यमातून एक पुल बांधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आपण आता नवीन तंत्रज्ञान व संशोधनाबाबत पाश्चिमात्य देशांवर फार काळ अवलंबून राहू इच्छित नाही. आपले स्वत:चे शास्त्रज्ञ आणि संशोधक तयार व्हायला हवेत.(प्रतिनिधी)नॅनो टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात मोठे संशोधन सुरू असले तरी ‘युनिसा’शी होत असलेल्या करारामुळे येथील विद्यार्थी आणि संशोधकांना इतर ‘ब्रिक्स’ देशांतील संशोधक व शास्त्रज्ञांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. लवकरच दोन्ही विद्यापीठांमध्ये करार होईल, असे डॉ. मोहिते यांनी सांगितले.