शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
4
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
5
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
6
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
7
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
8
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
9
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
10
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
12
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
13
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
14
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
15
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
16
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
17
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
18
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
19
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
20
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली

दौंड तालुक्यातील शेतकरी आक्रमक

By admin | Updated: January 16, 2015 03:06 IST

जर येथील शेतक-याना भामा आसखेड धरणाच्या पाण्याचा काहीही उपयोग होत नसेल तर त्यांच्या जमिनीवरील धरणग्रस्तांसाठी शेरे काढण्याचा सरकारचा अध्यादेश आहे. असे असताना याबाबत

राहू : जर येथील शेतक-याना भामा आसखेड धरणाच्या पाण्याचा काहीही उपयोग होत नसेल तर त्यांच्या जमिनीवरील धरणग्रस्तांसाठी शेरे काढण्याचा सरकारचा अध्यादेश आहे. असे असताना याबाबत काहीही कार्यवाही होत नाही. तसेच या जमिनीचे वाटप गुंंजवणी धरग्रस्तांसाठी होत असल्याने राहू बेट परिसरातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. येथे ताबा घेण्यासाठी धरणग्रस्त आल्यास त्यांना आमच्या रोषाला सामोरे जावे लागले असा इशारा त्यांनी दिला आहे.राहूबेट (दौंड) परिसरातील ९ गावांतील सुमारे १८ हजार एकर क्षेत्रावर ‘भामा-आसखेड धरणग्रस्तांसाठी राखीव क्षेत्र’ असा, तर काही ठिकाणी सात-बाऱ्याच्या मालकी हक्कात जिल्हाधिकारी नाव लागले आहे. या जमिनी मूळ मालकांना मिळाव्यात, यासाठी दौंड तालुका भामा-आसखेड संपादित क्षेत्र शेतकरी कृती समिती व शिरूर, हवेली शेतकरी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी आंदोलने , बैठका झाल्या. शासनाने भामा-आसखेड धरणाचे पाणी दौंड, शिरूर, हवेली या तालुक्यांतील शेतकऱ्यांना जाणार नसेल व या भागात कालवा होत नसेल, तर या शेतकऱ्यांच्या जमिनी भामा-आसखेड धरणग्रस्तांसाठी राखीव ठेवणे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे व त्यांच्यावर अन्यायकारक आहे, असा निर्णय घेऊन त्या जमिनी मूळ मालकांना देण्याबाबत अध्यादेश (आरपीए-३४१२/प्र.क्र.१0१/र-४ महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई-३२, दि. १/९/२0१४ ) काढला. परंतु, याबाबत अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नाही. या अध्यादेशाची अंमलबजावणी कधी होणार, याच्या प्रतीक्षेत बाधित शेतकरी आहेत. या सर्व प्रक्रिया विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झाल्या होत्या. नवीन सरकार सत्तेत येऊन तीन महिने पूर्ण झाले; परंतु त्याबाबत ठोस पाऊल उचलेले दिसत नाही. त्यानंतर हिवाळी अधिवेशनही पार पडले. काहीही निर्णय घेतला नसल्याने बाधित शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ते आता आंदोलनाची भाषा बोलू लागले आहेत.आमचे क्षेत्र लाभक्षेत्रात येत नाही. तसेच येथे कालवाही केला नाही. त्यामुळे आमच्या जमीनीवर धरणग्रस्तांसाठी राखीव असा शेरा टाकण्याचा अधिकार शासनास नाही. त्यात आरक्षीत जमीनीचे वाटप धरणग्रस्तांसाठी सुरू महसूल विभागाचे अधिकारी करीत आहेत. हे चुकीचे आहे. हे वाटप झाले असले तरी जे लोक ताब्यासाठी येतील त्या ठिकाणी रक्तपात झाला तरी आंम्ही मागे हटणार नाही असा इशारा पिलाण वाडी येथील शेतकरी महेंद्र झुरूंगे यांनी दिला आहे. (वार्ताहर)