शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आरबीआयप्रमाणे पेन्शनसाठी नाबार्डच्या माजी अधिकाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:17 IST

पिंपरी : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) कर्मचाऱ्यांप्रमाणे निवृत्ती वेतन (पेन्शन) मिळावे, निवृत्तीवेळी असणाऱ्या वेतनाइतकी पेन्शन द्यावी, अशा विविध ...

पिंपरी : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) कर्मचाऱ्यांप्रमाणे निवृत्ती वेतन (पेन्शन) मिळावे, निवृत्तीवेळी असणाऱ्या वेतनाइतकी पेन्शन द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हपमेंटच्या (नाबार्ड) माजी अधिकाऱ्यांनी सोमवारी आंदोलन केले.

युनायटेड फोरमअंतर्गत निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन आले. संसदेने १९८१ मध्ये आरबीआयचे कृषी पतपुरवठ्याशी संबंधित तीन विभाग वेगळे केले. त्यातून नाबार्डची स्थापना झाली. नाबार्डमध्ये कर्मचारीवर्ग हस्तांतरित करताना त्यांना आरबीआय प्रमाणेच वेतन, भत्ते आणि सेवा निवृत्तीचा लाभ मिळेल, असे सांगण्यात आले. तसेच, १९९३ मध्ये बनविलेली निवृत्ती वेतन नियमावलीही आरबीआय प्रमाणेच बनविली.

निवृत्तिवेतनात सुधारणा करण्यासाठी आरबीआयने २०१२ मध्ये केंद्रीय अर्थमंत्रालयाला प्रस्ताव पाठवला. नाबार्डने देखील तसाच प्रस्ताव पाठविला. आरबीआयच्या कर्मचाऱ्यांना त्याप्रमाणे लाभ मिळाले. मात्र, नाबार्डचे कर्मचारी त्यापासून वंचित राहिले. आरबीआय कर्मचारी वीस वर्षांनी निवृत्त झाल्यास त्याला पूर्ण निवृत्तीवेतन दिले जाते. हा बदल २०१३ पासून लागू झाला. निवृत्ती वेतनासाठी दहा महिन्यांच्या वेतनाची सरासरी अथवा शेवटचे वेतन यापैकी कर्मचाऱ्यांचे हिताचे वेतन म्हणून २०१७ पासून आरबीआयमध्ये लागू झाले. निवृत्ती वेतन पुनर्रचना आरबीआयमध्ये मार्च २०१९ मध्ये लागू झाली. तसेच, निवृत्ती वेतनाबाबत पर्याय देऊ न शकलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी अन्य पर्याय जून २०२० मध्ये आरबीआयमध्ये लागू झाला. आरबीआयमधील या सुधारणा नाबार्डमध्ये लागू केल्या नाहीत. नोव्हेंबर २०१९मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणी चार महिन्यांत निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी माजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नाबार्डच्या शिवाजीनगर येथील कार्यालयासमोर एक दिवस धरणे आंदोलन केले.

---

फोटो - निवृत्तिवेतनाच्या मागणीसाठी आंदोलन करताना नाबार्डचे निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी.