शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: आम्हाला राजकारण करायचे नाही, फक्त आरक्षण पाहिजे, मराठा आंदोलकांना त्रास देऊ नका- मनोज जरांगे
2
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तीव्रता वाढताच राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबद्दल पहिला निर्णय
3
जम्मूतील रियासी, रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे हाहाकार! तीन मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता
4
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
5
रितेश देशमुखचा मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा, म्हणाला- "मनोज जरांगेजी हे..."
6
"मराठी चित्रपटासाठी दोनदा कॉम्प्रोमाइज केलं", मेघा घाडगेचा धक्कादायक खुलासा, सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू
7
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
8
'त्या' व्हिडिओवर श्रीसंतची बायको संतापली; तिनं ललित मोदीसह मायकेल क्लार्कचीही काढली लाज; म्हणाली...
9
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
10
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
11
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
12
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
13
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
14
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..
15
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
16
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
17
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
18
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
19
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
20
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!

पुन्हा समाजप्रबोधनाकडे

By admin | Updated: September 11, 2016 01:34 IST

स्त्रीभ्रूणहत्येविषयी जागृती ते आॅलिम्पिक पदकविजेत्या महिला खेळाडूंचा सन्मान... स्वच्छतेच्या संदेशापासून व्यसनमुक्तीचा जागर

पुणे : स्त्रीभ्रूणहत्येविषयी जागृती ते आॅलिम्पिक पदकविजेत्या महिला खेळाडूंचा सन्मान... स्वच्छतेच्या संदेशापासून व्यसनमुक्तीचा जागर... लैंगिक शिक्षण ते लोकशिक्षण अन् पाणीबचतीपासून वृक्षारोपण... अशा विविध लोकजागर करणाऱ्या देखाव्यांनी यंदाचा लोकोत्सव रंगला आहे. लोकप्रबोधनपर देखाव्यांचे वाढलेले प्रमाण हे यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. शहराच्या मध्य भागासह उपनगरांमध्येही लहानमोठ्या अनेक मंडळांनी जिवंत, हलत्या देखाव्यांसह संदेशपर फलक लावून जनजागृतीवर भर दिला आहे.मागील काही वर्षांपासून छोटे-मोठे देखावे तयार करण्याकडे मंडळांचा कल वाढला आहे. काही वर्षांपर्यत पौराणिक, ऐतिहासिक, देशभक्तिपर देखाव्यांवर मंडळांचा भर होता. आता पुरोगामी महाराष्ट्राला साजेसे असे समाजप्रबोधनपर देखावे करण्याकडे मंडळांचा कल वाढल्याचे दिसत आहे. स्त्रीभू्रणहत्या, स्वच्छतेचा संदेश, महिलांवर होणारे अत्याचार, स्वच्छ पुणे, कचरामुक्त पुणे, पाणीबचत, रेनवॉटर हार्वेस्टिंग, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्महत्या, अनाथ मुले, साक्षरता, जीवघेणा सेल्फी, लैंगिक शिक्षण, हुंडाबळी, वृक्षारोपण, मुलींचे शिक्षण, शासकीय योजनांची माहिती असे विविध विषय घेऊन मंडळे गणेशभक्तांचे प्रबोधन करीत आहेत.सेल्फी विथ गाडगेमहाराजकचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने गोखलेनगरमधील सुयोग मित्र मंडळाने सादर केलेल्या ‘माझे पुणे, स्वच्छ पुणे’, ‘सेल्फी विथ गाडगेमहाराज’ या देखाव्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कचरा कसा निर्माण होतो, त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या, कचऱ्याचे प्रकार, त्याच्या वर्गीकरणाची गरज, तो वेगळा ठेवण्याच्या पद्धती, सफाई कर्मचाऱ्यांचे काम, स्वयंसेवी संस्थांच्या भूमिका, कचऱ्यापासून खत, बायोगॅस, वीजनिर्मिती या विषयांचा १० मिनिटांच्या जिवंत देखाव्यात समावेश आहे.