शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकनंतर भाजीपाला २० टक्क्यांनी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST

(स्टार डमी ८३१) पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुणे शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन लावावा लागला होता. अनलॉक झाल्यानंतर बाजार ...

(स्टार डमी ८३१)

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुणे शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन लावावा लागला होता. अनलॉक झाल्यानंतर बाजार सुरू झाला. मात्र, पावसाळा सुरू झाल्याने भाजीपाल्याची आवक कमी झाली. त्यामुळे मागणी जास्त आणि आवक कमी यामुळे विविध भाजीपाल्याच्या दरात २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

कांदा, टोमॅटो, बटाटे, भेंडी, मिरची, कारले, शेवगा, वांगे, मेथी, शेपू आणि पालक यांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. गृहिणी आता आहारात भाजीपाल्याऐवजी कडधान्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

------

पुन्हा वरणावर जोर...

१) कोरोनामुळे वर्षभरापासून आधीच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊन आणि पावसामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे जेवणात वरण करावे लागत आहे.

- संगीता कांबळे, गृहिणी

----

भाजीपाल्याचे दर वाढल्याने सध्या आम्ही आहारात पालेभाज्या करतच नाही. आर्थिकदृष्ट्या आमचे गणित बिघडून जाते. त्यामुळे कडधान्य ह्यावरच सध्या आमचा आहार आहे.

- मनीषा भोसुरे, गृहिणी

------

म्हणून वाढले दर...

१) गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने भावात वाढ झाली आहे.

- सुहास भुजबळ, व्यापार

----

२) पावसामुळे पुणे आणि परिसरातून भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. इतर जिल्ह्यातून भाजीपाला मागवावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने दरातही वाढ झाली आहे.

- लक्ष्मण टुले, व्यापारी

-------

शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा

१) पावसामुळे भाजीपाला शेतातच खराब झाला आहे. तोडीला आलेली सगळी मेथी सडली आहे. त्यामुळे ३ महिन्यांत केलेली मेहनतही निघाली नाही.

- प्रताप कदम, शेतकरी

----

२) आम्ही शेतात, पालक, शेपू आणि कोथिंबीर केली होती. ती आता काढायला आली होती. मात्र, सततच्या पावसामुळे शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे तिनही पिके सडून गेली आहेत.

- शंकर हारगुडे, शेतकरी

-------

* भाजीपाल्याचे दर (प्रति किलो)

भाजीपाला १३ जून २१ जून

कांदा १५ २०

टोमॅटो १० १५

बटाटे १५ २०

भेंडी २५ ३०

मिरची २५ ३०

कारले ३० ३५

शेवगा ४० ५०

वांगे ३० ४०

पालक १० १५