शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड, पुरंदरपाठोपाठ महापालिका शिवनेरीवरही साकारणार शिल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST

पुणे : सिंहगड किल्ल्यावर सन २०१७ मध्ये शूरवीर तानाजी मालुसरे यांचे भित्तीशिल्प उभारल्यानंतर पुरंदर किल्ल्यावर धर्मवीर संभाजी महाराजांचे शिल्प ...

पुणे : सिंहगड किल्ल्यावर सन २०१७ मध्ये शूरवीर तानाजी मालुसरे यांचे भित्तीशिल्प उभारल्यानंतर पुरंदर किल्ल्यावर धर्मवीर संभाजी महाराजांचे शिल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, आता महापालिकेच्या वतीने जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबाचे शिल्प उभारण्यात येणार आहे़

स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून, याकरिता दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली़

छत्रपती शिवाजी महाराजांचा महापराक्रम आणि राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि मार्गदर्शन अवघ्या भारत देशाला प्रेरणादायी आहेत. या दोघांना मानवंदना देण्यासाठी हे शिल्प महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असल्याचे रासने यांनी सांगितले़

----------------------

महापालिका हद्दीबाहेर गडकिल्ल्यांवर शिल्प उभारणे हे महापालिकेचे काम आहे का, असा प्रश्न उपस्थित केला असता रासने यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत असून, ही शिल्पउभारणी हा श्रध्देचा व आपला वैभवशाली इतिहास जतन करण्याचा प्रयत्न असल्याचे रासने यांनी सांगितले़ तसेच साडेआठ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेने या खर्चाचा भार उचलणे गैर नसल्याचेही ते म्हणाले़

--------------------------