शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

उत्सवानंतर शहरात साथीच्या आजारांत वाढ

By admin | Updated: September 30, 2015 01:36 IST

शहरात गणपती विसर्जनाच्या दिवशी होणाऱ्या लक्षणीय गर्दीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाल्याचे चित्र आहे. गर्दीमुळे शहरात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरत

पुणे : शहरात गणपती विसर्जनाच्या दिवशी होणाऱ्या लक्षणीय गर्दीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाल्याचे चित्र आहे. गर्दीमुळे शहरात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने शहरातील दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी होऊ लागली आहे.उत्सवादरम्यान वापरल्या जाणाऱ्या गुलालामुळेही अनेकांना श्वसनाचे विकार होतात. श्वसनाद्वारे गुलाल नाका-तोंडावाटे श्वसननलिकेत गेल्यामुळे अ‍ॅलर्जीच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. त्यामुळे घशाचा संसर्ग, खोकला आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टर दिलीप देवधर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या कालावधीत बाहेरगावाहून अनेक जण पुण्यासारख्या ठिकाणी गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी येतात. अशा प्रकारे बाहेर ठिकाणहून आलेले नागरिक आपण राहत असलेल्या ठिकाणी असणारे संसर्ग घेऊन येतात. त्यामुळे शहरातील एकूणच संसर्गात वाढ झाली आहे, असे डॉ. देवधर यांनी सांगितले.उत्सवानंतर कानाच्या तक्रारींमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लहान मुलांंपासून ते वयस्क व्यक्तींपर्यंत अनेक जण कानाच्या विविध तक्रारी घेऊन कान-नाक-घसातज्ज्ञांकडे गर्दी करीत आहेत. यामध्ये कानात गुलाल जाणे, ढोल, बँड अथवा स्पिकरच्या भिंतींमुळे कानात एकसारखा आवाज येणे, कानात कळ येणे अशा तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे येत असल्याचे कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. स्वानंद घोलप यांनी सांगितले. लहान मुलांना मोठ्या उत्साहात ढोल ऐकवण्यासाठी नेले जाते, मात्र त्यांच्या कानाचे पडदे नाजूक असल्याने त्यावर आघात होऊन त्यांच्या पडद्यांना त्रास होऊ शकतो. याबरोबरच यादरम्यान घशाच्या संसर्गांमध्येही वाढ होत असल्याने त्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. या सर्व तक्रारींमध्ये महिला व पुरुष यांच्यातील १८ ते ३० वर्षे वयोगटातील नागरीकांचे प्रमाण जास्त आहे. एरवी कान, नाक आणि घसा यांच्या तक्रारींसाठी आठवड्याला २० ते २५ रुग्ण येतात, तर आता त्यात दुपटीने वाढ झाली आहे. येत्या ८ ते १५ दिवसांत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे डॉ. घोलप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)