शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळानंतर कांद्याने रडविले

By admin | Updated: May 29, 2016 03:45 IST

मागील दोन महिन्यांपासून कांद्याचे दर सरासरी ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. बारामतीच्या बाजार समितीमध्ये कांद्याला प्रतिकिलो

बारामती : मागील दोन महिन्यांपासून कांद्याचे दर सरासरी ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. बारामतीच्या बाजार समितीमध्ये कांद्याला प्रतिकिलो ५ ते ६ रुपये दर मिळत आहे, तर, किरकोळ बाजारामध्ये कांदा ८ ते १० रुपये किलोने विकला जात आहे. कांद्याच्या घसरलेल्या दराचा फटका प्रामुख्याने बारामतीच्या जिरायती पट्ट्यातील गावांना बसला आहे.बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिरायती भागातील कारखेल, उंडवडी, देऊळगाव रसाळ, कारखेल या भागातून मोठ्याप्रमाणात कांद्याची आवक होत आहे. बाजारात नवीन गरवी हंगाम सुरू झाला आहे. तसेच, तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांनी पाणी असल्याने उसाचे पीक टाळून कांदा केला. उष्णतेमुळे कांदा साठवणूक करणे शेतकऱ्याला जिकिरीचे जात आहे. त्यामुळे बाजारात कांदाविक्रीसाठी येत आहे. परिणामी घाऊक व किरकोळ बाजारात कांद्याचे दर घसरले आहेत. घाऊक बाजारात ५ ते ६, तर किरकोळ बाजारात ८ ते १० रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. आवक वाढल्याने दर घसरले असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गतवर्षी कांद्याचे दर प्रतिकिलो ६० रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे कांदालागवडीकडे यंदा कल वाढला. अगदी काही ऊस उत्पादकांनीदेखील कांदा लागवडीला प्राधान्य दिले. मात्र, वाढलेली आवक, घसरलेले कांद्याच्या दरामुळे त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. कांद्याचा उत्पादन कालावधी ऊस पिकाच्या तुलनेने कमी आहे. त्यामुळेदेखील कांदा लागवडीकडे कल वाढीस लागल्याचे चित्र आहे. दराच्या प्रतीक्षेत काहींनी कांदा साठवणुकीला प्राधान्य दिले. मात्र, साठविलेला कांदा खराब होण्याच्या भीतीपोटी बाजारात आणावा लागत आहे. कांद्याला हमीभाव देण्याची मागणी होत आहे.मागील वर्षीपेक्षा सध्या आवक कमी आहे; मात्र यावर्षी उष्णतेमुळे कांद्याला उठाव मिळाला नाही. उष्णतेमुळे गुणवत्ताही ढासळली आहे. याचा परिणाम दरावर होऊन कांद्याचे दर घसरले आहेत; तसेच उष्णतेचा कडाका कायम असल्याने शेतकरी कांदा साठवूही शकत नाही. - अरविंद जगताप, सचिव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती