शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
4
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
5
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
6
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
7
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
8
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
9
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
10
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
11
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
12
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
13
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
14
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
15
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
16
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
17
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
18
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
19
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
20
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?

ममतेची अनुभूती देणारी आभाळमाया

By admin | Updated: May 15, 2017 06:36 IST

काहींचे आई-वडिलांचे छत्र हरपलेय, तर काहींना माता पिता, नातेवाईक असूनही आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने सांभाळणे शक्य नाही

मंगेश पांडे । लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी-चिंचवड : काहींचे आई-वडिलांचे छत्र हरपलेय, तर काहींना माता पिता, नातेवाईक असूनही आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने सांभाळणे शक्य नाही. अशा अनाथ, गरीब, गरजू, उपेक्षित मुलींसाठी मावळ तालुक्यातील आभाळमाया ही संस्था आधार ठरली आहे. त्यांच्यासाठी ही संस्था आभाळमायाच आहे. मावळ तालुक्यातील पाचाणे येथे शांताई शिक्षण प्रसारक मंडळाची आभाळमाया ही संस्था आहे. अक्षरओळख नसलेल्या शांताबाई येवले या आजीबाई अत्यंत सचोटीने या संस्थेचा कारभार पाहातात. मुलींचे संगोपन करीत आहेत. केवळ त्यांची निवासाची, जेवण, खाण्याची, शिक्षणाची सोयच नाही तर त्या मुलींना माता पित्याचे प्रेम देत आहेत. संस्थेस भेट देणाऱ्यांना या मुलींच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह दिसून येतो. या संस्थेप्रमाणेच समाजाकडेही त्या ‘आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ अशा भावनेतून आपले भाव व्यक्त करताना दिसून येतात. येवले यांनी २००३ ला ही संस्था स्थापन केली आहे. कोणाला त्यांची आई बालपणीच सोडून गेली आहे, तर कोणाचे मातापिता दुरावले आहेत, काहींचे मातापिता आहेत, पण गरिबीमुळे ते त्यांचा सांभाळ करण्यास असमर्थ ठरले आहेत. भूमिहीन झाल्याने कुटुंबाचा गाडा हाकताना, ओढाताण होते, त्यामुळे मुलींना काहींनी संस्थेत दाखल केले आहे. वंचित घटकातील मुलींना आधार देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून अव्याहतपणे सुरू आहे. शांताबाई यांच्या या कार्याला एक तपाचा कालावधी लोटला आहे.