शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

कचराकोंडी रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

By admin | Updated: December 31, 2014 23:27 IST

कचरा टाकण्यासाठी राज्यशासनाकडून महापालिकेला तातडीने जागा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले.

पुणे : शहरातील कचरा ऊरूळी (देवाची) व फुरसुंगी येथे टाकण्यास ग्रामस्थांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभुमीवर कचरा टाकण्यासाठी राज्यशासनाकडून महापालिकेला तातडीने जागा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर गुरूवारपासून होणाऱ्या आंदोलनास तोंड देण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याची कुमार यांनी दिली.ऊरूळी देवाची) व फुरसुंगी येथे ३१ डिसेंबरनंतर कचरा टाकू देणार नाही असे तिथल्या ग्रामस्थांनी आॅगस्ट २०१४ मध्ये मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये स्पष्ट केले होते. त्यानुसार १ जानेवारीपासून कचऱ्याच्या गाडया अडविण्याचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. १ जानेवारीपासून ग्रामस्थांकडून अटकाव केला जाणार असल्याच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची कुणाल कुमार व महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी माहिती दिली. कचरा प्रश्नावर दिर्घकालीन उत्तर शोधण्यासाठी महापालिकेला किमान एक ते सव्वा वर्ष लागणार आहे. शहरामध्ये दररोज १६०० ते १८०० टन कचरा निर्माण होतो. त्यातील किमान हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करून तो जिरविण्याचे लक्ष्य पालिकेने निश्चित केले आहे. मात्र तरीही दररोज ६०० ते ८०० टन कचऱ्याचा प्रश्न कायम राहणार आहे. त्यासाठी तातडीने जागा उपलब्ध होण्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय उपलब्ध नाही.दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितले की, ‘‘मोशी, पिंपरी सांडस येथील वनविभागाची जागा कचरा जिरविण्यासाठी मिळावी याकरिता राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. रोखेम येथे सध्या २५० टन कचऱ्यावर प्रक्रिया होते, येत्या दोन महिन्यात त्याची क्षमता ४०० टन इतकीवाढणार आहे. कचरा आपल्याच प्रभागात जिरविण्यासाठी कठोर भुमिका घ्यावी लागणार आहे. ’’ (प्रतिनिधी)४उरूळी (देवाची) व फुरसुंगी येथे कचरा टाकणे बंद झाल्यास शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्याचे महापालिका फक्त पुढील १५ दिवस नियोजन करू शकेल. कचरा प्रक्रियेसाठी मंजूर केलेले प्रकल्प उभारणीस एक ते सव्वा वर्षाचा अवधी लागणार आहे. तोपर्यंत उरूळी देवाची येथे कचरा डेपो कॅपिंग करण्यास परवानगी मिळावी किंवा तातडीने पर्यायी जागा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. ओला व सुका कचरा वेगळाच हवा४नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून टाकणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता घंटागाडी व स्वच्छ कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. त्याचबरोबर कचऱ्याच्या कंटेनरजवळ दोन पाळयांमध्ये कर्मचारी नेमले जाणार आहेत. बायोगॅस प्रकल्पांसाठी ओला कचऱ्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ओला कचरा मार्गी लागल्या शहरच्या निम्म्या कचऱ्याची समस्या सुटू शकेल असे दत्तात्रय धनकवडे यांनी स्पष्ट केले. शहरासाठी कचरा हे मोठे आव्हान आहे. गेल्या २० वर्षात कचरा तिप्पटीने वाढला आहे. गेल्या ४ महिन्यात कचऱ्यासाठी अनेक पर्यायी जागा मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत कचरा रस्त्यावर राहू दिला जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कचरा जिरविण्याच्या प्रकल्पांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.’’ - कुणाल कुमार, आयुक्तजवळच्या शेतांमध्ये कचरा जिरविणार४शहरालगतच्या शेतांमध्ये कचरा टाकण्यास १० शेतकऱ्यांनी मान्यता दिली आहे. त्यांच्या शेतांमध्ये महापालिकेकडून मोठे खडड्े घेण्यात आले आहेत. त्याठिकाणी ओला कचरा टाकून ते खडड्े बुजविण्यात येणार आहेत. पुढच्या ३ महिन्यांमध्ये कचरा प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जाणार असल्याचे कुणाल कुमार यांनी सांगितले.