पिंपरी : सोनसाखळी चो:यांमध्ये दिवसेंदिवस होत असलेली वाढ, भरदिवसा घडणा:या लूटमारीच्या घटना, वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून सुसाट वेगात धावणारी वाहने अन् यामुळे घडणारे अपघात, अशा घटना दररोज घडत असतानाही सीसीटीव्ही कॅमेरे बसत नसल्याने प्रशासन आणखी कोणत्या गंभीर गुन्ह्याची वाट पाहतेय का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
शहराचे नागरीकरण वाढत असताना गुन्ह्यांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक घटनांमध्ये सीसीटीव्ही कॅमे:याची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. असे असताना ‘बेस्ट सिटी’ कडे वाटचाल करीत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात नानाविध कारणास्तव सीसीटीव्ही बसविण्यास अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.
शहरात विविध उद्योगधंदे असल्याने कामानिमित्त अनेकजण शहराबाहेरून येथे वास्तव्यास आले आहेत. यामुळे नागरीकरणही वाढले आहे. लोकसंख्या वाढत असताना नागरिकांची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. गुन्हेगारी थोपविण्यासाठी विविध स्तरावर उपाययोजना राबविल्या जात असताना शहरातील मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. गृहविभागाकडून पुणो आणि पिंपरी-चिंचवड शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. हे काम एका कंपनीला देण्यात आले आहे.
त्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणांची दोन ते तीन वेळा पाहणी करण्यात आली. कॅमेरे बसविण्यासाठी ‘पॉईंट फिक्स’ करण्यात आले. शहरातील काही ठिकाणी कॅमेण्यांची वायरिंग टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. मात्र, विविध परवानग्या आणि विविध कारणास्तव अद्यापही सीसीटीव्ही कॅमे:यांची उभारणी होऊ शकलेली नाही.
एखादी घटना घडल्यास सर्वप्रथम त्या परिसरात कॅमेरे आहेत का, याची चाचपणी केली जाते. सीसीटीव्हीचे फुटेज तपासले जातात. पोलीस ब:याचदा घटना घडल्याच्या ठिकाणी असलेले दुकानाचे अथवा घराचे कॅमेरे तपासतात. मात्र, त्या कॅमे:यांची चित्र टिपण्याची क्षमता चांगली नसल्याने काहीही हाती लागत नाही.
सोनसाखळी चोरी असो अथवा इतर मोठय़ा गुन्ह्यातील आरोपी पकडण्यास सीसीटीव्हीचा फायदा होऊ शकतो. तसेच वाहतुकीचे नियम तोडणा:या वाहनचालकांवर यामुळे बारकाईने लक्ष ठेवता येईल. कॅमे:यांची चित्र टिपण्याची क्षमता चांगली असल्यास वाहनांवरील क्रमांकाच्या आधारे गुन्हेगारांर्पयत पोहचणो शक्य होते.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मोरवाडी चौक, निगडीतील टिळक चौक, शक्ती-भक्ती चौक, केएसबी चौक, चिंचवड स्टेशन चौक, चापेकर चौक, डांगे चौक, काळेवाडी चौक, नाशिक फाटा चौक, भोसरीतील पीएमटी चौक या चौकांत नेहमीच मोठी वर्दळ असते. याठिकाणांसह शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची संस्था, संघटनांकडून मागणी होत आहे.
एखादी दुर्घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही बसविण्याचा मुद्दा उपस्थित केला जातो. तर शहरात सीसीटीव्ही बसविण्याचे भिजत
घोंगडे किती दिवस राहणार, असा
मुद्दा शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)
शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम अलाईट डिजीटल सव्र्हिस लिमिटेड (एडिएसएल) या कंपनीकडून सुरू आहे. शहरात सुमारे 8क् ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सर्व कॅमेरे चांगल्या दर्जाचे आहेत. 3क् मीटर अंतरार्पयत चित्र टिपण्याची क्षमता या कॅमे:यांमध्ये आहे. शहरात कॅमेरे बसविण्यासाठी काही परवानग्यांची आवश्यकता असते. यापैकी परवानग्या मिळालेल्या ठिकाणचे खोदाईचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित ठिकाणची खोदाई लवकरच पूर्ण करण्यात येईल. वायरिंग टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच खांब उभारून कॅमेरे बसविण्यात येतील. या कामासाठीच्या निविदा प्रक्रियेची मुदत ऑगस्टर्पयत आहे. मात्र, काही अडचणी येत असल्याने आणखी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो.
- राजेंद्र एरंडे, प्रकल्प अधिकारी, एडीएसएल.
संबंधित कंपनीला महापालिका हद्दीत सीसीटीव्ही कॅमे:याच्या वायरिंग व खांब उभारणीसाठी 72 ठिकाणी खोदाई करण्यास परवानगी दिलेली आहे. कंपनीने खोदाई स्वत: करायची असून ते पूर्ववत करण्याचे काम महापालिका करणार आहे. खोदाईचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याचेही संबंधित कंपनीला कळविले आहे.
- प्रवीण तुपे, सहशहर अभियंता
शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमे:यांची आवश्यकता आहे. कॅमेरे बसविण्याचे काम तातडीने पूर्ण होणो गरजेचे आहे. आमच्याकडूनही वारंवार यासाठी पाठपुरावा सुरू असतो. गुन्ह्यांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेजचा फायदा होतो. हे काम लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
- महेंद्र रोकडे,
सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग.