शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांवर कारवाई होणार

By admin | Updated: December 9, 2014 23:36 IST

जिल्ह्यात सुळसुळाट झालेल्या बोगस डॉक्टरांच्या पाश्र्वभूमीवर बारामती तालुका आणि परिसरात असणा:या बोगस ‘डॉक्टरांवर’ कारवाई करण्यासाठी तालुकास्तरीय समिती नेमण्यात आली आहे.

बारामती : जिल्ह्यात सुळसुळाट झालेल्या बोगस डॉक्टरांच्या पाश्र्वभूमीवर बारामती तालुका आणि परिसरात असणा:या बोगस ‘डॉक्टरांवर’ कारवाई करण्यासाठी तालुकास्तरीय  समिती नेमण्यात आली आहे. ही समिती तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर नजर ठेवणार आहे. गावोगावी खासगी आरोग्य सेवा पुरविणा:या डॉक्टरांची माहितीही समिती संकलित करणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अधिक माहिती देताना डॉ. जगताप म्हणाले, ‘‘या समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी राहुल काळभोर असतील. या तालुकास्तरीय समितीची पहिली बैठक पुढील आठवडय़ात होणार आहे. तीत गटविकास अधिका:यांसोबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जगताप  यांच्यासेाबतच  संपूर्ण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी तसेच तालुक्यातील पोलीस ठाण्यातील प्रभारी प्रमुख यांचा सदस्य म्हणून समावेश असेल.
याअंतर्गत बेागस डॉक्टरांवर ‘एफआयआर’ दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर खटले दाखल करण्यात येणार आहेत. याबाबत नागरिकांनी आपल्या कार्यक्षेत्रतील प्राथमिक ओराग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका:यांच्या निर्दशनास आणून देण्याचे आवाहन डॉ. जगताप यांनी केले आहे. तालुक्यात 97 ग्रामपंचायती आहेत, तर 9 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या गावांमध्ये आरोग्य कर्मचारी बोगस डॉक्टरांबाबत पाहणी करतील. त्यानंतर संबंधित गावातील वैद्यकीय अधिकारी अहवाल सादर करतील. गावातील डॉक्टरांचे शैक्षणिक प्रमाणपत्र तपासण्यात येणार आहे. (वार्ताहर)
 
या बोगस डॉक्टरांवर एफआयआर दाखल करण्यात येऊन त्यांची ‘प्रॅक्टिस’ बंद करण्यात येणार आहे. या संदर्भात नागरिकांनी आपल्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका:यांशी संपर्क साधावा.
- डॉ. महेश जगताप
तालुका वैद्यकीय अधिकारी