शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर, वेल्ह्यात वाळूतस्करांवर कारवाई

By admin | Updated: June 20, 2016 01:11 IST

वाळूउपसा करणाऱ्या बोटींचा पाठलाग करून तहसीलदार वर्षा लांडगे व महसूल विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली.

इंदापूर : वाळूउपसा करणाऱ्या बोटींचा पाठलाग करून तहसीलदार वर्षा लांडगे व महसूल विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील चांडगाव भागातील नदीपात्रात पाच बोटी जप्त केल्या. त्या क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढून त्यांची इंजिने फोडली. सकाळी सात वाजल्यापासून ही कारवाई सुरू करण्यात आली होती. मध्यंतरी काही काळ कारवाई झाली नसल्याने निर्ढावलेल्या वाळूमाफियांनी परत डोके वर काढण्यास सुरुवात केली होती. बोटींच्या संख्येत वाढ झाली होती. नेमक्या या पार्श्वभूमीवर आज महसूल विभागाने दणका दिला. त्यामुळे पळापळ झाली. काही बोटी भिगवणच्या दिशेने पळाल्या. त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन, इंजिने फोडून बोटींची गच्छंती करण्यात आली. बेकायदा बिगरपरवाना वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध होणाऱ्या कारवाईमध्ये पाटबंधारे विभागाने व ग्रामपंचायतीने सहभाग घेतला पाहिजे; तसेच ग्रामपंचायतीने वाळू वाहतुकीस निर्बंध घातले पाहिजेत, अशी तहसीलदार वर्षा लांडगे यांनी अपेक्षा व्यक्त केली. (वार्ताहर)अंबवणे मंडल : मार्गासनी वेल्हे तालुक्यातील अंबवणे मंडलातील अनधिकृत उत्खननाबाबत कारवाई करण्यात आली. काही वाहनांकडून दंडदेखील वसूल करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार वनश्री लाभसेटवार यांनी दिली. ९ जून रोजी सकाळी तहसीलदार वनश्री लाभसेटवार यांनी अनधिकृत उत्खननाबाबत शोधमोहीम राबविली. यामध्ये अंबवणे मंडलातील अकरा वीटभट्ट्यांचे पंचनामे करण्यात आले. या पंचनाम्यात अंदाजे ८ हजार १५८ ब्रास माती दिसून आली आहे. पंचनामा करताना वीटभट्टीमालक व उपस्थितांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केली नाहीत, यामुळे पंचनामे करण्यात आल. येथील अकरा वीटभट्टीधारकांना खुलासा करण्यासाठीच्या नोटिसा दिल्या आहेत. वीटभट्टीधारकांनी ५ दिवसांच्या आत खुलासा न केल्यास अनधिकृत उत्खनन आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचे तहसीलदार वनश्री लाभसेटवार यांनी सांगितले. या कारवाईत अंबवणे येथे क्रशर वाहनचालकांकडून ४३,५९४ रुपये दंड वसूल करण्यात आला. मार्गासनी येथे गट नं. २०९ मध्ये अनधिकृत गौणखनिज उत्खनन करताना ५ ट्रॅक्टर व एक जेसीबी आढळून आले होते. या वाहनांकडून १,५८,९९२ रुपये दंड वसूल करण्यात आला. वेल्हे तालुक्यात प्रथमत:च एवढी मोठी कारवाई करण्यात आल्याने अनधिकृत वाहतूक करणारे व अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.