शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील खंडपीठासाठी कृती समिती

By admin | Updated: May 1, 2017 02:32 IST

मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी पुणे बार असोसिएशनच्या पुढाकाराने कृती समिती

पुणे : मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी पुणे बार असोसिएशनच्या पुढाकाराने कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या कृती समितीची पहिली बैठक शनिवारी पुणे जिल्हा न्यायालयातील अशोका हॉल येथे पार पाडली.पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र दौंडकर यांनी यावेळी कृती समितीची पुढील रूपरेषा मांडली. पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष, ज्येष्ठ वकील असे मिळून एकूण २५० हून अधिक वकिलांचा या कृती समितीत समावेश करण्यात आलेला आहे.यावेळी दादासाहेब बेंद्रे, हर्षद निंबाळकर, अहमदखान पठाण, व्ही. डी. कर्जतकर, एन. डी. पाटील, गणेश कवडे, वैशाली चांदणे, विजय सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी खंडपीठ मागणीबाबत मनोगते व्यक्त केली.जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, सर्व पक्षांचे पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व व्यापारी संघटना, लहान-मोठे व्यावसायिक, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था अशा सर्व प्रकारच्या विविध क्षेत्रातील मान्यवर आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा पाठिंबा मिळवून खंडपीठ मागणीची चळवळ प्रभावी करण्याचे प्रयत्न करायचे, असा ठराव यावेळी करण्यात आला. पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष हेमंत झंजाड, संतोष जाधव, आॅडिटर कुमार पायगुडे, सदस्य, स्वप्निल काळे आदी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आंदोलनाची चाळिशीमुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे, ही मागणी पुण्यातील वकिलांकडून गेली ४० वर्षे केली जाते आहे. याचा पाठपुरावा करण्यासाठी आतापर्यंत वकिलांकडून वेळोवेळी वेगवेगळी आंदोलने करून या मागणीकडे लक्ष वेधण्यात येते आहे. मात्र अद्यापही या मागणीकडे कोणी लक्ष दिलेले नाही. त्यासाठी वकिलांनी आता कायमस्वरूपी कृती समिती स्थापन केली आहे. त्याची पहिली बैठक शनिवारी पार पडली.