शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गज अभिनेत्याचे वागणे साधे

By admin | Updated: April 28, 2017 06:02 IST

दिग्गज अभिनेता असूनही कोणतीही प्रौढी नाही... विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी मिळून-मिसळून वागणारे... आश्वासक वातावरण निर्माण करण्याचे कसब

पुणे : दिग्गज अभिनेता असूनही कोणतीही प्रौढी नाही... विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी मिळून-मिसळून वागणारे... आश्वासक वातावरण निर्माण करण्याचे कसब, अशा अभिनेत्याच्या आठवणींना एफटीआयआयमध्ये उजाळा मिळाला. ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना एफटीआयआयच्या वतीने गुरुवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विनोद खन्ना २००१ ते २००५ या काळात संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. श्रद्धांजली सभेला एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कॅथोला, फिल्म रिसर्च आॅफिसर चंद्रशेखर जोशी, प्रोडक्शन मॅनेजर के. ए. शेख यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. विनोद खन्ना यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास छायाचित्रांच्या माध्यमातून झळकला. विनोद खन्ना यांचा गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला ‘अचानक’ हा चित्रपट या वेळी दाखवण्यात आला.के. ए. शेख म्हणाले, ‘एफटीआयआयचे अध्यक्ष असताना सुषमा स्वराज यांच्यासह त्यांची पहिली भेट याच थिएटरमध्ये झाली होती. त्या वेळी त्यांना घ्यायला आणि सोडायला जाण्याचा योग आला होता. त्या वेळी, संस्थेची परिस्थिती वाईट होती. एफटीआयआय बंद होतेय की काय, अशी भीती निर्माण झाली होती; मात्र संस्था बंद पडणार नाही आणि यातूनही मार्ग मिळेल, अशी आश्वासकता त्यांनी सर्वांमध्ये निर्माण केली. विनोद खन्ना सर्वांशी मिळून-मिसळून वागायचे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांंती देवो, हीच प्रार्थना.’