शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

वाहन आणि मोबाईल चोरी करणारे आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST

२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी पुणे शहरासहित जिल्ह्यात वाहनचोरी आणि मोबाईल चोरी करणारे दोघांना जेरबंद करून त्याच्याकडून १ ...

२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी पुणे शहरासहित जिल्ह्यात वाहनचोरी आणि मोबाईल चोरी करणारे दोघांना जेरबंद करून त्याच्याकडून १ लाख ५३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त आहे. यातील एक जण ५ गुन्ह्यातील पाहिजे असलेला रेकॉर्डवरील फरारी आरोपी आहे.

याप्रकरणी आकाश दयानंद गायकवाड (वय २२, रा. आबनावे वाडा, उरुळी देवाची, ता. हवेली), प्रशांत मधुकर भोसले वय २०, रा. पालखी मार्ग, उरुळी देवाची, पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. रविवार (१० जुलै ) रोजी दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप पोलीस हवालदार उदय काळभोर, राजेश अभंगे, विनायक रामाणे, मनोज शिंदे, शाकिर खान, राजेश लोखंडे, शिवाजी जाधव, मनोज खरपुडे, संभाजी गंगावणे हे पथक वानवडी, हडपसर पोलीस ठाण्याचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना जाधव व खरपुडे यांना बातमीदाराकडून रामटेकडी येथे एमआयडीसी पुणे कचरा विलगीकरण प्रकल्प गेटसमोर येथे एका चोरीचे दुचाकीवर दोन ‌इसम बसलेले असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. वरिष्ठांनी दिलेले आदेश व सूचनाप्रमाणे सदर ठिकाणी स्टाफच्या मदतीने सापळा रचून मोठ्या शिताफीने गायकवाड व भोसले यांना दुचाकीसह पकडले. त्यांचेकडील स्प्लेंडरबाबत माहिती घेतली असता, ती वानवडी पोलीस ठाण्याचे हद्दीतून चोरली असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांचेकडे १८ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल मिळून आले. तसेच अधिक चौकशीत त्यांनी आणखीन मोटरसायकल चोरी केल्याचे व उरुळी देवाची येथील एका इमारतीचे मागे विहिरीजवळ लपवून ठेवल्याचे सांगितले. पथकाने तेथून लोणी काळभोर, हडपसर, वानवडी, कोंढवा, वाकड या पोलीस ठाण्याचे हद्दीत चोरलेल्या २ स्प्लेंडर, २ स्प्लेंडर प्लस, १ बजाज पल्सर व १ यामाहा असा एकूण १ लाख ५३ हजार रुपये किमतीच्या ६ दुचाकी जप्त केल्या आहेत. यामुळे हडपसर पोलीस ठाण्यातील २ तर कोंढवा, लोणी काळभोर, वानवडी आणि वाकड पोलीस ठाण्याचे हद्दीतील प्रत्येकी १ असे वाहनचोरीचे ६ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच त्यांनी चोरी केलेल्या मोबाईल फोनबाबत तपास चालू आहे.

यातील आकाश गायकवाड हा लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीतील २ तर, कोंढवा, यवत, अंबोली (मुंबई) पोलीस ठाण्याचे हद्दीतील प्रत्येकी १ अशा एकूण ५ गुन्ह्यातील फरारी आरोपी असून, त्यास सध्या लोणी काळभोर पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे. तर प्रशांत भोसले यांस कोंढवा पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे, श्रीनिवास घाडगे सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ लक्ष्मण बोराटे पोलीस निरीक्षक, वाहनचोरी विरोधी पथक २ सुनील पंधरकर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस हवालदार उदय काळभोर, राजेश अभंगे, विनायक रामाणे, मनोज शिंदे, शाकिर खान, राजेश लोखंडे, शिवाजी जाधव, मनोज खरपुडे, संभाजी गंगावणे यांनी केली आहे.