शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:11 IST

धायरी: लग्नानंतर हुंड्यामध्ये मोटारसायकलची मागणी करून पत्नीला मानसिक व शारीरिक छळ दिल्याने तिच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या तसेच चार वर्षांपासून ...

धायरी: लग्नानंतर हुंड्यामध्ये मोटारसायकलची मागणी करून पत्नीला मानसिक व शारीरिक छळ दिल्याने तिच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या तसेच चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस सिंहगड रस्ता पोलिसांनी नेपाळच्या सीमेरेषेवरून अटक केली आहे. सलीम तबारक अन्सारी (वय ३०, रा. जंगल बेलवा, पडरौना ठाणे, कुशीनगर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत समिना खातून बनाम सलीम अन्सारी (उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी यांची मुलगी नसीमाबरोबर लग्न झाल्यावर दोन-तीन महिन्यांनंतर आरोपी हुंड्यामध्ये मोटारसायकलची मागणी करू लागला. आरोपी पती हा पत्नी नसीमाला मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याने फिर्यादीने आपल्या मुलीला माहेरी नेले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या घरी जाऊन गावातील लोकांच्या मध्यस्थीने पुन्हा नसिमाला आणले. त्यानंतर मात्र १४ एप्रिल २०१६ रोजी नसीमाचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याचे समजले. याबाबत उत्तर प्रदेश येथे फिर्यादीने तक्रार दाखल केली होती. मात्र नसीमाने नऱ्हे, पुणे येथे गळफास घेतल्याने हा गुन्हा तपासासाठी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव, पोलीस शिपाई मयूर पतंगे, पोलीस शिपाई संदीप पवार यांनी उत्तर प्रदेश येथे जाऊन तब्बल बारा दिवस तांत्रिक मदतीच्या साहाय्याने तपास करून आरोपीस नेपाळच्या सीमारेषेवरून ताब्यात घेतले. आरोपी हा दुबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना सिंहगड रस्ता पोलिसांनी त्याला पकडले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.