शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीमध्ये प्रशासनावर आरोप

By admin | Updated: October 16, 2016 04:09 IST

विधान परिषद व नंतर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेची भीती असल्याने नगरसेवकांना निधी संपविण्याची घाई झाली आहे.

पुणे : विधान परिषद व नंतर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेची भीती असल्याने नगरसेवकांना निधी संपविण्याची घाई झाली आहे. त्यामुळेच स्थायी समितीची खास सभा बोलावण्यात आली, मात्र त्यात प्रशासनावर आरोप करून चर्चा मात्र साध्या विषयांचीच झाली.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य राजू पवार यांनी प्रशासन कामांच्या संदर्भात लवकर निर्णय घेत नाही अशी टीका केली. रस्त्यांची बहुसंख्य कामे निविदेतील रकमेपेक्षा सुमारे ४५ टक्के रकमेने कमी आली असताना काही कामे मात्र फक्त ५ टक्के कमी दराने आली आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी या कामांबाबत निर्णय घेणे स्थगित ठेवले होते. त्यातील काही कामे पवार यांच्या प्रभागातील आहेत. त्यामुळे त्यांनी समितीच्या सभेतच प्रशासन जाणीवपूर्वक असे करीत असल्याचा आरोप केला व मला आजच सर्व निर्णय हवे आहेत अशी मागणी केली. ते शक्य नसल्याचे अन्य सदस्य त्यांना समजावत होते.मात्र पवार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काही हरकती असतील तर त्याचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाला महिनाभराचा कालावधी का लागतो असा प्रश्न त्यांनी केला. यावर संबंधित प्रकरणांच्या फाईल्स तपासून त्वरित निर्णय घेऊ असे प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतर पवार यांनी ते मान्य केले. माजी उपमहापौर आबा बागूल यांनी सार्वजनिक वाहतुकीचा प्रवासी वर्ग वाढावा व त्यातून वाहतुकीची कोंडी, त्यामुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे यासाठी महिन्यातून एक दिवस पीएमपीचा प्रवास विनामूल्य करावा व तेवढी रक्कम पालिकेने पीएमपीला द्यावा, असा प्रस्ताव स्थायी समितीकडे दिला होता. हा प्रस्ताव अभिप्रायासाठी प्रशासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिली. रस्ते व अन्य कामांच्या १२ विषयांना मंजुरी देण्यात आली. निवडणूक आचारसंहितेपूर्वी प्रभागांमध्ये कामे सुरू व्हावीत असा नगरसेवकांचा आग्रह आहे. त्यामुळेच कामांच्या मंजुरीसाठी म्हणून शनिवारची खास सभा आयोजित करण्यात आली होती. सभेतील मंजुरीमुळे आता संबंधित कामांचे कार्यारंभ आदेश निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी समितीची नियमित सभा होईल, असे बोडके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)