शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण कामांमुळेच अपघात

By admin | Updated: May 24, 2016 06:07 IST

बीआरटी मार्गात घुसणारे वाहनचालक, अपूर्ण कामे यांमुळेच नगर रस्ता बीआरटी मार्गावर अपघात होत असल्याचा खुलासा प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी केला. अपघातांच्या कारणावरून

पुणे : बीआरटी मार्गात घुसणारे वाहनचालक, अपूर्ण कामे यांमुळेच नगर रस्ता बीआरटी मार्गावर अपघात होत असल्याचा खुलासा प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी केला. अपघातांच्या कारणावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न सोमवारच्या सर्वसाधारण सभेत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, मनसेने केला; मात्र महापौर तसेच राष्ट्रवादीचे सभागृह नेते ठाम राहिल्यामुळे तो फसला. अपूर्ण कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा मार्ग बंद करावा, अशी मागणी शिवसेना, भाजपा, काँग्रेस, मनसेचे सदस्य करीत होते; पण महापौर प्रशांत जगताप यांनी प्रशासनाचा आधार घेऊन या मागणीतील हवा काढली. पीएमपीचे अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांच्या खुलाशाने अडचणीत येणार, अशी कल्पना असल्यामुळेच की काय; पण आयुक्त कुणाल कुमार सभागृहातून निघून गेले. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षीय सदस्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली व अपुऱ्या कामांचा खुलासा त्यांच्याकडेच मागावा, अशी मागणी केली. राष्ट्रवादीचे सुभाष जगताप यांनी तर आयुक्तांमुळेच नगरसेवक, पदाधिकारी विनाकारण बदनाम होत आहेत. तेच या अपघातांना जबाबदार आहेत, अशी टीका केली. मनसेचे बाळा शेडगे, वसंत मोरे, राजू पवार, किशोर शिंदे यांनी महापौरांवर निशाणा साधत त्यांच्या घाईमुळेच अपघात होत आहेत, असा आरोप केला. काँग्रेसचे अविनाश शिंदे यांनी प्रशासनाला सुनावतानाच महापौरांनाही तुम्हाला जबाबदारी टाळता येणार नाही, याची जाणीव करून दिली. भाजपच्या मुक्ता टिळक, अशोक येनपुरे, धनंजय जाधव यांनी बीआरटी मार्गच चुकीच्या पद्धतीने तयार गेला असल्याचे सांगितले. सेनेच्या पृथ्वीराज सुतार, संजय भोसले यांनी केलेली कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बीआरटी मार्ग बंद ठेवा, ही मागणीच नंतर सर्वांनी उचलून धरली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विशाल तांबे, सतीश म्हस्के, महेंद्र पटारे आदींनी चर्चेत भाग घेतला; मात्र सर्वपक्षांची टीका परतवून लावताना खरा किल्ला लढवला तो सभागृह नेते बंडू केमसे यांनी. सुरुवातीला आयुक्त कुणाल कुमार यांनी, तर नंतर कृष्णा यांनी खुलासा केला. महापौर जगताप यांनी अपघात बीआरटीमुळे होतात, हे म्हणणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. अपूर्ण कामे महिनाभरात पूर्ण होतील, असे आश्वासन प्रशासनाकडून सभागृहाला देऊन त्यांनी मार्ग बंद ठेवण्याची मागणी धुडकावली. जबाबदारी ढकलू नयेबहुसंख्य सदस्यांचा रोख या मार्गात सातत्याने होत असलेल्या अपघातांवरून सत्ताधारी राष्ट्रवादीला बदनाम करण्याचाच होता. भाजपाचे गणेश बीडकर, मनसेचे राजेंद्र वागसकर, सेनेचे अशोक हरणावळ यांनी तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका वृद्धाच्या बळीला या मार्गाचे घाईघाईने उद््घाटन करणारी राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी कृष्णा, आयुक्त कुणाल कपूर व महापौर या तिघांच्याही महापालिका व पीएमपीएलबरोबर आलेल्या संबंधांचा उल्लेख करून त्यामुळे आता कोणीही एकमेकांवर जबाबदारी ढकलू शकणार नाही, अशी टीका केली.