पुणो : इयत्ता अकरावीचे विविध व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने संस्थास्तरावरच होणार आहेत. ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत अर्ज केलेल्या विद्याथ्र्याना थेट संस्थेत जाऊन प्रवेश घेता येणार आहे. त्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने पुणो व पिंपरी-चिंचवडमध्ये 1क् मदत केंद्रे सुरू केली आहेत.
पुणो व पिंपरी-चिंचवडमधील 36 संस्थांमध्ये व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून अकरावीसाठी विविध व्यवसाय अभ्यासक्रम चालविले जातात. त्यांमध्ये इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी, कॉमर्स, अॅग्रिकल्चर, पॅरामेडिकल, फिशरी आणि होमसायन्स या सहा गटांतील 3क् अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांचे प्रवेश केंद्रीय प्रवेशप्रक्रियेअंतर्गत होणार नाहीत. प्रवेशासाठी विद्याथ्र्यानी उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम घेणा:या संस्थांत जाऊन प्रवेशासाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी राजेंद्र घुमे यांनी दिली.
संस्थांमधील उपलब्ध अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाचा तपशील, प्रवेशाची पद्धत यांबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणो शहरात 7 व पिंपरी-चिंचवडमध्ये 3 मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ही मदत केंद्रे सकाळी 1क् ते सांयकाळी 5 वाजेर्पयत सुरू राहतील, असे घुमे यांनी सांगितले.
मार्गदर्शन व मदत केंद्रे
1. शासकीय तांत्रिक विद्यालय, घोले रस्ता - 942क्676771, 9822516965
2. शाहू महाविद्यालय, पर्वती - 9क्11क्985क्8, 985क्क्41277
3. राजा धनराजगिरजी कनिष्ठ महाविद्यालय, कॅम्प - 97666459क्2, 992246क्647
4. नूतन मराठी विद्यालय - 9823क्81191, 9764311777
5. मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, गणोशखिंड - 985क्891क्27, 97623888क्2
6. कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय - 9923649618
7. लक्ष्मणराव आपटे कनिष्ठ महाविद्यालय - 982398क्653
8. नवमहाराष्ट्र विद्यालय, पिंपरी वाघेरे - 82753क्6682, 9922887982
9. श्री म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डी - 989क्631क्49, 9921239711
1क्. श्री नागेश्वर विद्यालय, मोशी - 9822453क्24, 9922326962.