शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

काँगे्रसचे अजित दरेकर यांना स्वीकृतची लॉटरी

By admin | Updated: April 20, 2017 07:04 IST

महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत काँगे्रस आणि शिवसेनेचे संख्याबळ समान असल्याने या दोघांपैकी एका नावाची बुधवारी सकाळी

पुणे : महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत काँगे्रस आणि शिवसेनेचे संख्याबळ समान असल्याने या दोघांपैकी एका नावाची बुधवारी सकाळी प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये काँगे्रसचे अजित दरेकर यांना लॉटरी लागली. तर राष्ट्रवादी काँगे्रसच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा अर्ज सुनावणीमध्ये बाद करण्यात आल्याने स्वीकृतसाठी सुभाष जगताप यांची निवड झाली.महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या पाच जागांसाठी मंगळवार (दि.१८) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक ९८ सदस्य असलेल्या संख्याबळानुसार भाजपाच्या वाट्याला तीन जागा आल्या. तर राष्ट्रवादी काँगे्रससाठी एक आणि शिवसेना व काँगे्रस सदस्यांची संख्या समसमान असल्याने दोघांपैकी एक जागा मिळणार होती. यासाठी मंगळवारी काँगे्रसच्या वतीने अजित दरेकर यांनी तर शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक योगेश मोकाटे यांनी अर्ज दाखल केला होता. या दोघांपैकी कोण, यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता राजेंद्र जगताप यांच्या कार्यालयात चिठ्ठी टाकून निर्णय घेण्यात आला. दोघांच्या नावांच्या चिठ्ठ्या बंद डब्यात टाकून शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये काँग्रेसचे अजित दरेकर यांना कौल मिळाला. याप्रसंगी प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप, नगरसचिव सुनील पारखी, सहआयुक्त विलास कानडे, विधी सल्लागार अ‍ॅड. रवींद्र थोरात, उपायुक्त सुहास मापारी, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, माजी नगरसेवक प्रशांत बधे हे उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने एका जागेसाठी सुभाष जगताप आणि रूपाली चाकणकर यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. यामध्ये चाकणकर यांनाच अंतिम संधी मिळणार होती. पक्षाच्या वतीने चाकणकर यांना तीन दिवस आगोदरच सर्व कागदपत्रांची पुर्तता करण्याच्या सूचनादेखील दिल्या होत्या, परंतु भाजपा कार्यकर्त्यांच्या राडाबाजीमध्ये चाकणकर यांना अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे देण्यास उशीर झाला. या तांत्रिक कारणामुळे चाकणकर यांचा अर्ज बाद करण्यात आला. यामुळे अपेक्षित नसताना देखील जगताप यांना स्वीकृत म्हणून संधी मिळाली. (प्रतिनिधी)