शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

लाच स्वीकारून बंधाऱ्यात सोडले पाणी?

By admin | Updated: May 6, 2017 01:59 IST

येथील परिसरातील ओढा, नवीन बंधाऱ्यात ग्रामपंचायतीच्या मागणीशिवाय खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्री

लोकमत न्यूज नेटवर्कपारवडी : येथील परिसरातील ओढा, नवीन बंधाऱ्यात ग्रामपंचायतीच्या मागणीशिवाय खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा पाणी सोडले. ठराविक बड्या बागायतदारांकडून लाच घेऊन पाणी सोडल्याची चर्चा परिसरात आहे. या प्रकारची चौकशी करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत येथील ग्रामस्थ सचिन होले यांनी सांगितले की, माझा पाण्याअभावी तीन एकर ऊस जळून गेलेला आहे.  याबाबत आम्ही काही शेतकऱ्यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याची मागणी करूनदेखील शेतीला पाणी दिले नाही. मात्र, गावातील ओढ्यात पाणी का सोडले, याबाबत खडकवासला पाटबंधारे विभाग इंदापूर शाखेचे अभियंता के. के. देवकाते यांना संपर्क साधला असता, पारवडी ग्रामपंचायतीने पाणी सोडण्याची मागणी केल्यामुळे पाणी सोडल्याचे सांगितले. परंतु, पारवडीचे ग्रामसेवक शहानूर शेख यांनी आम्ही खडकवासला पाटबंधारे विभागात पाणी सोडण्याची मागणी केली नसल्याचे सांगून याबाबत मला काहीही माहीत नसल्याचे सांगितले. मागील आठवड्यापासून इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी तलावात खडकवासला कालव्याचे पाणी सोडण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले होते, तर दुसरीकडे याच कालव्यातील पाणी पारवडीच्या बंधाऱ्यात संबंधित विभागातील अधिकारी लाच स्वीकारत सोडत आहेत. याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.