पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या कोथळे येथे आरोग्य उपकेंद्र आहे. कोथळे ग्रामपंचायतीचे सरपंच शहाजी जगताप, तसेच सदस्य व ग्रामस्थांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र गावात सुरू व्हावे, अशी मागणी केली होती . या मागणी नुसार दि.१ एप्रिलपासून कोथळे आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरू करण्यात आले. कोथळे, भोसलेवाडी, रानमळा, धालेवाडी,व नाझरे या पाच गावातील नागरिक तसेच जेजुरी व परिसरातील नागरिक या केंद्रावर येऊन लस घेत आहेत. बेलसर व कोथळे आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रत्येक लाभार्थींना लस देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून कोणीही लसीकरणापासून वंचित राहणार नाहीत, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. भरतकुमार शितोळे यांनी सांगितले.
कोथळे ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य उपकेंद्रासमोर सावलीसाठी मंडप टाकण्यात आला असून लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या, तसेच फिल्टरचे पाणी, चहा, बिस्कीट आदी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
उपसरपंच वंदना जगताप, ग्रामपंचायत सदस्य अभिजित जगताप,सामाजिक कार्यकर्ते दत्ताआबा भोईटे, पोलीस पाटील नामदेवआबा भंडलकर आदी याठिकाणी नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत आहेत.
बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्रावर डॉ. भरतकुमार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी आबा राजवाडे, संजय रोटे, शामल गाढवे, हेमदास राठोड, आशावर्कर मनीषा शिर्के, मंगल दोडके यांनीही लसीकरण मोहीम यशस्वी केली आहे.
१० जेजुरी