शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपात गैरप्रकारांच्या तक्रारी दफ्तरी दाखल

By admin | Updated: March 21, 2017 05:35 IST

महापालिकेकडे गर्भपात केंद्रामध्ये होत असलेल्या गैरप्रकारांबाबत तक्रारी दाखल होऊनही त्यावर कारवाई न करता त्या दफ्तरी दाखल

पुणे : महापालिकेकडे गर्भपात केंद्रामध्ये होत असलेल्या गैरप्रकारांबाबत तक्रारी दाखल होऊनही त्यावर कारवाई न करता त्या दफ्तरी दाखल करण्यात आल्याचा आरोप लेक लाडकी संस्थेचे समन्वय गणेश बोऱ्हाडे यांनी केला आहे. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी व उपआरोग्यप्रमुख डॉ. अंजली साबणे यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी बोऱ्हाडे यांनी महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.कसबा पेठ, भवानी पेठ व नारायण पेठेतील ३ हॉस्पिटलनी गर्भपात कायदा १९७१च्या विविध कलमांचा भंग केल्याप्रकरणी त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यापैकी भवानी पेठेतील हॉस्पिटलकडून २१ आठवड्यांचा गर्भपात करण्यात आल्याने त्यावर योग्य ती कारवाई करावी अशा सूचना अतिरिक्त आरोग्य संचालकांकडून देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांच्यावर कारवाई न करता त्या दफ्तरी दाखल करण्यात आल्या अशी तक्रार बोऱ्हाडे यांनी आयुक्तांकडे केली आहे. गेल्या ४ वर्षांत गर्भपात केंद्राविरुद्ध एकही तक्रार दाखल नसल्याची माहिती १५ दिवसांपूर्वी उपआरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी दिली होती. यापार्श्वभूमीवर गर्भपात केंद्रांविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारींची कागदपत्रे बोऱ्हाडे यांनी सादर केली आहेत. गणेश बोऱ्हाडे म्हणाले, ‘‘गर्भपात कायद्यामध्ये नोटिसा देण्याची तरतूद नाही, तरीही हॉस्पिटलना नोटिसा देण्यात आल्या. त्यानंतर त्रुटी आढळून येत नसल्याचे कारण देत गर्भपात केंद्रांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली नाही.’’ (प्रतिनिधी)