शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत ९६ नवीन चेहरे

By admin | Updated: February 25, 2017 02:31 IST

अनेक दिग्गज सभासदांची परंपरा असलेल्या पुणे महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहामध्ये १६२ पैकी ९६ जण पहिल्यांदाच निवडून आले आहेत

पुणे : अनेक दिग्गज सभासदांची परंपरा असलेल्या पुणे महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहामध्ये १६२ पैकी ९६ जण पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळे सभागृहामध्ये नवीन चेहऱ्यांची संख्या लक्षणीय असणार असून, त्यांच्या समवेत निवडून आलेल्या ६६ सिनिअर सभासदांचे मार्गदर्शन त्यांना मिळू शकणार आहे. नवीन सभादांची संख्या खूपच मोठी असल्याने त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन सर्वच राजकीय पक्षांसह महापालिका प्रशासनाला करावे लागणार आहेत.महापालिकेच्या सभागृहाचे कामकाज मुंबई महापालिका अधिनियमानुसार पार पाडले जाते. प्रत्येक महिन्याला किमान एक मुख्य सभा घेण्याचे बंधन प्रशासनावर आहे. या मुख्य सभेमध्ये शहराच्या विकासाशी संबंधित कामांना मंजुरी देणे, प्रभागातील नागरिकांच्या समस्या मांडण्याचे काम नगरसेवकांकडून केले जाते. लेखी प्रश्नोत्तर, ऐनवेळी उपस्थित केले जाणारे प्रश्न, तहकुबीचा प्रस्ताव, हरकत नोंदविणे आदी मार्गांनी नगरसेवकांना आपला सहभाग सभागृहात नोंदविता येतो. सभागृहात सक्रिय राहून अनेक प्रश्न मार्गी लावता येऊ शकतात. मात्र, त्यासाठी सभागृहाच्या कामकाजाची सविस्तर माहिती सभासदांना असणे आवश्यक असते. त्यामुळे त्यांना याबाबतचे योग्य प्रशिक्षण प्रशासनाला द्यावे लागणार आहे. नगरसेवकांना वॉर्डस्तरीय निधी व अंदाजपत्रकातील प्रभागाचा निधी या आधारे विकासकामे पार पाडता येतात. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांकडे प्रस्ताव कसा दाखल करायचा, तेथून २२ टेबलांवरून होणारा प्रस्तावाच्या फाइलींचा प्रवास योग्य वेळेत व्हावा यासाठी करावा पाठपुरावा याची माहिती नगरसेवकांनी करून घेणे आवश्यक आहे. याबाबतची नीटशी माहिती न मिळाल्यामुळे नव्याने नगरसेवक झालेल्या अनेकांचे पहिले वर्ष-सहा महिने असेच निघून जातात. त्यामुळे याचीही माहिती सभासदांना देणे आवश्यक आहे.प्रशासनाबरोबर नवीन सभासदांना प्रशिक्षण देण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या राजकीय पक्षांवर असणार आहे. भाजपाकडून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये सभासदांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. इतर पक्षांनीही यासाठी पुढाकार घेऊन नवीन नगरसेवकांना कामकाजाची माहिती देणे आवश्यक असणार आहे.