शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांत उभी केली ९०१ जणांची कंत्राटी आरोग्य टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत रुग्णालयातील मनुष्यबळ अपुरे ठरत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत रुग्णालयातील मनुष्यबळ अपुरे ठरत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मागील पंधरा दिवसांत जिल्हा परिषदेकडून कंत्राटी स्वरूपात तब्बल ९०१ मनुष्यबळ उभे केले आहे. यात एमडी डाॅक्टरापासून ते वैद्यकीय अधिकारी यांच्यासह नर्स, आरोग्यसेविका, क्ष-किरण तंत्रज्ञ यांची नियुक्ती केली आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरासह ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. एक महिन्याभरात या लाटेने जिल्ह्यात कहर माजवायला सुरवात केली. विशेषत: ग्रामीण भागात बाधितांची संख्या दुप्पट ते तिपटीने वाढू लागल्यामुळे उपचारासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली. अशा परिस्थितीत ग्रामीणमध्ये रूग्णांना उपचार देताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य विभागावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे कोविड सेंटरही बंद ठेवले. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आरोग्य सभापती प्रमोद काकडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ ठोस पावले उचलत कंत्राटी पध्दतीने पदभरती करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार मागील पंधरा दिवसांत (३१ मार्च ते १५ एप्रिल) २८ एमबीबीएस डॉक्‍टर, ५४ बीएएमएस डॉक्‍टर, ७८ बीडीएस डॉक्‍टर यांची नियुक्ती केली. त्याचबरोबर ११४ स्टाफ नर्स, ४०० आरोग्य सेविका, १३० डाटा ऑपरेटर, १५ क्ष-किरण तंत्रज्ञ, ८ इसीजी तंत्रज्ञ आणि ९ हॉस्पिटल मॅनेजर यांची नियुक्ती केली आहे. १३ तालुक्‍यांसाठी ही नियुक्ती असून त्यामध्ये एमबीबीएस डॉक्‍टरांची संख्या तुलनेने कमी होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी केवळ ६ एमबीबीएस डॉक्‍टर कार्यरत होते, तर आज नव्याने भरती केल्यामुळे एमबीबीस डॉक्‍टरांची संख्या २८ झाली आहे.